SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘लोन’ घेताना काय काळजी घ्याल..? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, फायदा होईल..

स्वत:चं हक्काचं घर खरेदी करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं.. त्यासाठी अनेक जण बॅंकांकडून ‘होमलोन’ घेत असतात.. मात्र, होमलोन (Home loan) घेण्यापूर्वी, फक्त व्याजदर व ‘ईएमआय’ (EMI) जाणून घेणं पुरेसं नाही. होमलोनच्या परतफेडीला अनेक वर्षे जातात. त्यामुळे होमलोन घेताना काही बाबींची काळजी घेणं आवश्यक असतं..

खरं तर कर्ज (debt) देण्यापूर्वी बँका अनेक बाबी तपासत असतात. त्यात कर्जदाराचे उत्पन्न, क्रेडिट स्कोअर (credit score), परतफेडीची क्षमता पाहून ‘होमलोन’ मंजूर केलं जातं.. ‘होमलोन’साठी आवश्यक निकषांची पूर्तता न केल्यास, तुमचा अर्ज बॅंकांककडून नाकारलाही जाऊ शकतो.

Advertisement

अशी घ्या काळजी..

गरज पाहून कर्ज घ्या…
बॅंकांकडून लोन घेण्यापूर्वी तुमची नेमकी किती गरज आहे, हे पाहा.. तुम्ही ‘ईएमआय’ किती देऊ शकता, याचा विचार करून कर्ज घ्या. तुमचा ‘ईएमआय’ पगाराच्या 40 टक्क्यांपेक्षा अधिक नसावा.

Advertisement

जादा ‘डाऊन पेमेंट’
ज्या कर्जदारांना व्याजाचा खर्च कमी करायचा आहे, त्यांनी कर्जाच्या डाऊन पेमेंटसाठी शक्य असल्यास अधिक रक्कम भरावी. जास्त डाऊन पेमेंटमुळे ‘क्रेडिट रिस्क’ कमी होते. त्यामुळे कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.

क्रेडिट स्कोअर वाढवा
कर्ज देण्यापूर्वी बँका तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’ तपासतात.. तुमचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला कर्ज मंजूर होऊ शकते.. चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते. त्यामुळे भविष्यात होमलोन घेणार असला, तरी आतापासूनच ‘क्रेडिट स्कोअर’ सुधारण्यासाठी प्रयत्न करा.

Advertisement

‘ईएमआय’चे पैसे राखून ठेवा
अनेकदा नोकरी गेल्यास किंवा आर्थिक संकट आल्यास कर्ज फेडण्यात अडचणी येऊ शकतात. ‘ईएमआय’ वेळेवर भरला न गेल्यास, दंड होतोच, शिवाय ‘क्रेडिट स्कोअर’वरही परिणाम होतो.. त्यामुळे किमान सहा महिन्यांसाठी अंदाजे ‘ईएमआय’ हप्त्यांची रक्कम शिल्लक ठेवा.

बँकांच्या ऑफरची तुलना
होमलोनसाठी अर्ज करण्यापूर्वी बँका, गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून दिलेल्या ऑफरची तुलना करा.. त्यातून चांगली ऑफर देणाऱ्या संस्थेचे कर्ज घ्या..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement