SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘इथे’ मिळतेय फक्त 12 हजारांत स्कूटर, हप्त्यावर देखील खरेदी करता येणार..

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे निश्चितच आपण एक तर इलेक्टिक बाईककडे वळतो किंवा सेकंद हँड बाईक खरेदीकडे वळतो. पण यामध्येही होतं असं की, इलेक्ट्रिक बाईक घेतली तर आपण कमी अंतरावरच्या ठिकाणी जास्त वापर करू शकतो कारण दूर जायचं म्हटलं की, चार्जिंगची सोय होणं सध्यातरी कठीण आहे. म्हणून काही महिने तरी सेकंड हँड बाईक हा चांगला पर्याय ठरेल आणि स्वस्तात मिळणारी ही ठरेल.

सुझुकी कंपनीची Suzuki Access 125 ही कंपनीची लोकप्रिय स्कूटर असून ही दमदार इंजिनसोबतच अधिक मायलेज देखील देते. कंपनीच्या या आकर्षक स्कूटरमध्ये आधुनिक फीचर्स देखील बघायला मिळतात. तर कंपनीने या स्कूटरची सुरुवातीची किंमत 75 हजार रुपयांच्या आसपास ठेवली आहे, जी टॉप व्हेरियंटसाठी 85 हजारपर्यंत जाते. पण खूपच कमी बजेटमध्येही स्कूटर हवी असेल तर देशातील अनेक वेबसाईटवरून तुम्ही ती ऑनलाईन अगदी सहज खरेदी करू शकतात. याशिवाय काही ठिकाणी अर्ध्याहून कमी किंमतीत ती खरेदी करून तुम्हाला परवडणार देखील आहे.

Advertisement

1) OLX

Suzuki Access 125 स्कूटरचे 2015 या वर्षीचे मॉडेल OLX वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. ही स्कूटर तुम्ही या वेबसाईटवरून केवळ 15 हजार रुपयांच्या जवळपास खरेदी करू शकणार आहेत. ही स्कूटर खरेदी करण्यासाठी कंपनीकडून फायनान्स सुविधा देण्यात आलेली नाही.

Advertisement

2) DROOM

Suzuki Access 125 या स्कूटरचे DROOM वेबसाईटवर 2013 या वर्षीचे मॉडेल विकण्यासाठी पोस्ट करण्यात आले आहे. ही स्कूटर या वेबसाईटवरून केवळ 19 हजार रुपयांच्या किंमतीमध्ये खरेदी करता येणार आहे. या वेबसाईटवर खरेदी करण्यासाठी तुम्हाला अत्यंत मोठा फायदा हा होणार आहे की, ही स्कूटर खरेदी करण्यासाठी कंपनीकडून फायनान्स सुविधा मिळणार आहे. जेणेकरुन तुम्ही हप्त्यावर ही स्कूटर खरेदी करु शकतात.

Advertisement

3) QUIKR

आता स्कूटर व इतर बाईक्स विकणाऱ्या अजून एका वेबसाईटचं नाव आहे QUIKR वेबसाईट. Suzuki Access 125 स्कूटरचे 2012 या वर्षीचे मॉडेल QUIKR वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवले गेले आहे. ही स्कूटर या वेबसाईटवरून फक्त 12 हजार रुपयांच्या जवळपास किंमतीत तुम्ही खरेदी करू शकतात. याशिवाय स्टॉक संपल्यास तुम्हाला 16 हजार, 22 हजार रुपयांच्या जवळपास इतर मॉडेल देखील खरेदी करता येतील. या स्कूटरसाठी कंपनीकडून कोणतीही फायनान्स सुविधा उपलब्ध नाही.

Advertisement

सुझुकी ॲक्सेस 125 स्कूटरचे फीचर्स:

▪️ 124 cc सिंगल सिलेंडर इंजिन
▪️ इंजिनची शक्ती 9.8 Nm च्या पीक टॉर्कसह जास्तीत जास्त 8.58 PS पॉवर बनवते.
▪️ मायलेजसंबंधी कंपनीचा दावा: Suzuki Access 125 स्कूटर एक लिटर पेट्रोलमध्ये 53 किमी चालवता येऊ शकते. हे कंपनीने ARAI कडून प्रमाणित देखील केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement