SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठला ऐतिहासिक निच्चांक

अमेरिकन डॉलरच्या (US dollar) तुलनेत भारतीय रुपयाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून यामुळे भारतीय रुपयाने गेल्या काही महिन्यांतील निच्चांक पातळी गाठली आहे. आता रुपया 78.37 रुपयांवर पोहोचला आहे. मागील तीन आठवड्यांत भारतीय रुपयात जवळपास 4.2 टक्क्यांनी घसरण झाली असून ही अर्थव्यवस्थेसाठी सध्याची सर्वात चिंताजनक बाब आहे.

बाजारातील तज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की, भारतीय रुपया लवकरच प्रति डॉलर 80 रुपयांपर्यंत पोहोचेल. कोरोना बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि आरबीआयच्या घोषणेमुळे गेल्या तीन आठवड्यांत खूपच दबाव आला होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने रुपयाचे नुकसान मर्यादित झाले.
आंतरबँक परकीय चलन बाजारात, स्थानिक चलन डॉलरच्या तुलनेत 78.13 वर उघडले. गुरुवारच्या व्यवहारादरम्यान तो 78.37 चा उच्च आणि 78.40 चा विक्रमी नीचांक होता.

बुधवारी 78.32 ची विक्रमी पातळी गाठली :
रुपया अखेरीस 78.32 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला. मागील बंद किंमतीच्या तुलनेत 19 पैशांनी घसरला. मागील सत्रात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 78.37 वर बंद झाला होता.

तुमच्यावर काय होणार परिणाम?
रुपयाच्या विक्रमी नीचांकी पातळीवर गेल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. भारतीय चलनाच्या घसरणीचा सर्वात मोठा परिणाम आयातीवर होणार आहे. भारतात आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढतील.

देशात 80 टक्के कच्चे तेल आयात केले जाते, म्हणजेच भारताला कच्च्या तेलासाठी जास्त किंमत मोजावी लागेल आणि परकीय चलन जास्त खर्च होईल. अशा परिस्थितीत तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात.

Advertisement