बॅंकिंग व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. बँका व वित्तीय संस्थांच्या (Non-Banking Financial company) डेबिट (Debit) व क्रेडिट (credit) कार्डबाबत भारतीय रिझर्व्ह बॅंकेने काही नियम केले होते. बदललेले हे नियम, येत्या 1 जुलैपासून लागू केले जाणार होते. मात्र, त्यात आता बदल करण्यात आला आहे..
भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून हे नवीन नियम लागू करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार, 1 जुलैऐवजी आता 31 ऑक्टोबरनंतर हे नवे नियम लागू केले जाणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) डेबिट व क्रेडिट कार्ड वापरासाठी नेमके काय बदल केले आहेत, हे जाणून घेऊ या..
डेबिट-क्रेडिट कार्डबाबतचे नवे नियम
- एखाद्या ग्राहकाने ‘क्रेडिट कार्ड’ घेतल्यापासून 30 दिवसांत ते ‘अॅक्टिव्ह’ केलं नाही, तर संबंधित बँक ग्राहकाकडून ‘ओटीपी’ (One Time Password) घेऊन ते कार्ड ‘अॅक्टिव्ह’ करण्यास मंजुरी घेऊ शकणार आहे. कार्डधारकाकडून त्यास मान्यता न मिळाल्यास, 7 दिवसांत कोणतेही शुल्क न आकारता बॅंकेकडून ते ‘क्रेडिट कार्ड’ रद्द केले जाणार आहे.
- दुसरा नियम असा करण्यात आला आहे, की कोणत्याही ग्राहकाच्या पूर्वसंमतीशिवाय बॅंकांना क्रेडिट मर्यादा वाढविता येणार नाही. त्यासाठी ग्राहकांची परवानगी घ्यावी लागणार आहे..
दरम्यान, बँकांची सर्वोच्च संस्था ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ (IBA)ने कार्डसाठी तयार केलेले नवीन नियम लागू करण्यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदत मागितली आहे. बँका आणि इतर संबंधित पक्षांचे म्हणणे जाणून घेतल्यावर रिझर्व्ह बँकेने 1 जुलैपासून केली जाणारी नियमांची अंमलबजावणी पुढे ढकलली आहे.
याबाबत ‘आरबीआय’कडून एक निवदेन जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, 1 जुलै 2022 पासून लागू होत असलेल्या काही नवीन नियमांची अंमलबजावणी करण्याची अंतिम मुदत 3 महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. नवे नियम आता 1 जुलैऐवजी 1 ऑक्टोबरपासून लागू होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे..