SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘जनरल तिकिटा’बाबत रेल्वेचा मोठा निर्णय, प्रवाशांचा होणार ‘असा’ फायदा..!!

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेतील गर्दी टाळण्यासाठी ‘जनरल तिकीट’ बंद केलं होतं. त्यामुळे आरक्षित तिकीट असलेल्या लोकांनाच रेल्वे प्रवास करता येत होता.. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 1 मार्च 2022 पासून काही ट्रेनमध्ये ‘जनरल तिकीट’ सुरू करण्यात आलं होतं.

काही ठराविक रेल्वेेसाठीच हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.. त्यानुसार, आता सर्व ‘मेल-एक्स्प्रेस’, तसेच ‘सुपरफास्ट’ ट्रेनमध्येही ‘जनरल तिकिट’ सुरू करण्यात आले असून, त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे..

Advertisement

मध्य रेल्वेच्या सर्व मेल-एक्स्प्रेस व सुपरफास्ट ट्रेनचे ‘जनरल तिकीट’ (General Ticket) आता सर्वत्र मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही रिझर्वेशन शिवाय प्रवाशांना ऐनवेळी तिकीट काढूनही रेल्वे प्रवास करता येणार आहे. येत्या 29 जूनपासून हा निर्णय लागू होणार असल्याचे सांगण्यात आले.

येथे मिळणार जनरल तिकिट..
रेल्वेच्या ‘एटीव्हीएम’, ‘जीटीबीएस’, अनारक्षित तिकीट काऊंटर व ‘यूटीएस’ मोबाईल ॲपद्वारे हे ‘जनरल तिकीट’ मिळणार आहे. त्यामुळे ‘वेटिंग लिस्ट’वर असलेल्या, तसेच ऐनवेळी प्रवासाचं नियोजन करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर बरेच दिवस रेल्वेचे ‘जनरल तिकीट’ बंद ठेवण्यात आले होते.. मधल्या काळात उन्हाळ्याच्या सुट्ट्या, तसेच लग्नाची धामधूम असल्याने प्रवाशांची गर्दी वाढली होती. मात्र, त्याच वेळी ‘जनरल तिकीट’ मिळत नसल्याने अनेकांची अडचण होत होती.

विशेष म्हणजे, रेल्वे कर्मचाऱ्यांकडूनच ‘तुमच्या रिस्कवर विनातिकिट गाडीत बसा..’ असा सल्ला दिला जात होता. मात्र, तसे पकडले गेल्यास तिकिटाच्या रकमेपेक्षा दुप्पट दंड आकारणी केली जात होती.. एकीकडे जनरल तिकिट बंद, तर दुसरीकडे दंडाची वसुली.. यामुळे रेल्वे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती..

Advertisement

मध्य रेल्वेने ‘जनरल तिकिट’ सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने रेल्वे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांची मोठी सोय झाल्याचे बोलले जाते..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement