SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

Poco F4 5G आज भारतात होतोय लॉन्च

POCO F4 5G च्या ग्लोबल लाँचची माहिती गेले काही दिवस सातत्याने समोर येत आहेत. परंतु भारतीय लाँचची कोणतीही ठोस माहिती समोर आली नव्हती. आता स्वतः कंपनी ट्विट करून POCO F4 5G भारतात 23 जून (आज) लाँच केला जाईल, असं सांगितलं आहे. देशात या स्मार्टफोनला वनप्लस, रियलमी आणि मोटोरोलाकडून चांगलीच टक्कर मिळू शकते.

POCO F4 5G स्मार्टफोन आज भारतासह जागतिक बाजारात देखील सादर केला जाईल, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. या दिवशी एका इव्हेंटचे आयोजन करण्यात येईल जो संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. या इव्हेंटचं थेट प्रक्षेपण पोको इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व युट्युब चॅनेलसह फ्लिपकार्टवरून देखील बघता येईल.

Advertisement

POCO F4 चे स्पेसिफिकेशन्स

Poco F4 5G 2400 x 1080 पिक्सल च्या रिझॉल्यूशन सोबत 6.67 इंचाचा सॅमसंग E4 AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट सोबत 360Hz टच सँपलिंग दिले जाईल. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 SoC दिले जाईल. हा फोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर काम करणारा असेल.

Advertisement

एवढेच नाही तर, या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. ज्यात प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल, सोबत 13MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 5MP ची टेलीफोटो लेन्स मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 32MP चा कॅमेरा देण्यात येईल. आगामी पोको स्मार्टफोन 4,5000mAh च्या बॅटरीसह येईल जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.

Poco F4 5G अंदाजे किंमत
एका लीक नुसार, Poco F4 5G चे 8GB + 256GB व्हेरियंट ग्लोबली 459 डॉलर रिटेल असणार असून याच व्हर्जनची भारतातील किंमत 26 हजार 999 रुपये आहे. बँक ऑफर्स सोबत या फोनची किंमत 23 हजार 999 रुपये होऊ शकते.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement