SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता कॉल उचलण्यासाठी स्मार्टफोन, हेडफोन्सची गरज संपली; ‘हा’ स्मार्ट चष्मा करणार सगळी कामं

आपल्याला लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंमध्ये काळानुसार बदल होत चालला आहे. काही वर्षांपूर्वी कोणालाही माहित नसलेला स्मार्टफोन आता मूलभूत गरज बनला आहे. रोज आपण स्मार्टफोनसहित अनेक इतरही गॅजेट्स वापरत असतो. दृष्टी अधिक स्पष्ट व्हावी यासाठी आपण चष्म्याचा वापर करतो. मात्र आता हाच चष्मा आपण प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीवर इतर गोष्टींसाठी वापरणार आहोत. जी कामं आपण स्मार्टफोनच्या मदतीने करतो, ती कामं आता लवकरच चष्म्याच्या (Eye Glasses) मदतीनं करता येणार आहेत.

नॉइज या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स उत्पादक कंपनीने नुकतेच काही स्मार्ट ग्लासेस लॉंच केले आहेत. या ग्लासेसमध्ये अनेक आकर्षक फीचर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. नॉइज कंपनीनं उत्पादित केलेला हा पहिला स्मार्ट आयवेअर हे लिमिटेड एडिशन डिव्हाइस आहे. या डिव्हाइसची किंमत 5,999 रुपये इतकी आहे.

हे स्मार्ट ग्लासेस तुम्ही नॉइज कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. नॉइज आय 1 स्मार्ट ग्लासेस (Noise i1 Smart Glasses de) असं या डिव्हाइसला नाव देण्यात आलं आहे. हे डिव्हाइस ब्लूटूथ व्हर्जन 5.1 वर काम करतात.

या स्मार्ट ग्लासेसमध्ये ब्लू लाइट फिल्टरिंग ट्रान्स्परंट लेन्स असल्यामुळे युझर्सच्या डोळ्यावर कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही. युजरचं धोकादायक यूव्ही रेजपासूनही संरक्षण होतं. हे स्मार्ट ग्लासेस वॉटरप्रूफ आणि स्प्लॅश प्रतिरोधक आहेत. नॉइज आय 1 स्मार्ट ग्लासेसची निर्मिती संपूर्णतः भारतीय बनावटीची आहे. नॉइज आय 1 स्मार्ट ग्लासेसमध्ये मोशन इस्टिमेशन, मोशन कम्पेन्सेशन आणि मॅग्नेटिक चार्जिंगसारखी आकर्षक फीचर्स देण्यात आली आहेत.

Advertisement