SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

…आणि आजच्या दिवशी धोनीनं भारतासाठी रचला होता इतिहास

भारतीय संघाचा माजी कर्णधार, कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2020 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, अजूनही उत्कृष्ट कर्णधाराच्या यादीत त्याचं नाव अव्वल स्थानी घेतलं जातं. यामागचं कारणही तितकचं खास आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं अनेकदा यशाचे शिखर गाठलंय. दरम्यान, आजच्या दिवशी म्हणजेच 23 जून 2013 मध्ये देखील धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती.

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने अशी काही कामगिरी केली आहे जी जगातील अन्य कोणत्याही संघाच्या कर्णधारला जमली नाही. धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा फडकवला. तर धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं आणखी एक पराक्रम करून 2013 च्या आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बलाढ्य इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला. आयसीसीच्या मर्यादीत षटकांच्या तिनही स्पर्धांचं विजेतेपद मिळवणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.

Advertisement

या सामन्यात इंग्लंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 50 षटका ऐवजी 20 षटकाचा खेळण्यात आला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून 129 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीनं सर्वाधिक 43, रविंद्र जाडेजानं नाबाद 33 तर, शिखर धवननं 31 धावांची खेळी केली. इंग्लंड समोर 20 षटकात 130 धावांचे आव्हान हे काहीच नव्हते.

मात्र तरी देखील भारताने हा सामना 5 धावाने जिंकला. सामन्याचा टर्निंग पॉईंट म्हणजे जिंकण्यासाठी 20 धावा कमी असताना मॉर्गनने 33 आणि बोपाराने 30 धावांवर आपली विकेट गमावली. त्यानंतर इंग्लंड टीम धक्क्यातून सावरू शकली नाही आणि जेतेपद 5 धावांनी हुकले.

Advertisement

दरम्यान, या विजयासह, एमएस धोनी क्रिकेट इतिहासातील सर्व प्रमुख आयसीसी ट्रॉफी (50 ओव्हर वर्ल्ड कप, 20 ओव्हर वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. शिखर धवनला प्लेअर ऑफ द सिरीज निवडले गेले तर रवींद्र जडेजा सामनावीर ठरला.

Advertisement