SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर! शेतकऱ्यांना मिळणार 50 हजारांचे अनुदान

मुंबई : राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सत्ता नाट्य पाहायला मिळत होते. अशातच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानं मोठी खळबळ उडाली. या सत्ता नाट्यानंतर आता लवकरच ठाकरे सरकार जाणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सर्व गदारोळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल कॅबिनेटची बैठक घेतली आहे. या बैठकीत फारसे मंत्री उपस्थित नसले तरी मुख्यमंत्र्यांकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंतचे अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवस आधीच केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर आता मोठा निर्णय घेतला असून आता नियमित पीक कर्ज फेडणाऱया शेतकऱयांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचे अनुदान मिळण्यास मंजुरी दिली आहे.

Advertisement

राज्यात महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे, तरी देखील असंख्य शेतकऱ्यांना फायदेशीर असणारा हा निर्णय मविआ सरकारकडून घेण्यात आलेला आहे. या निर्णयाच्या संगणकीय बाबी पूर्ण होऊन लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. जे शेतकरी कर्जाची नियमीत परतफेड करतात. अशा शेतकऱ्यांची यादी बँकांनी सरकारला पाठवली आहे, त्यामुळे पुढील दोन आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

अनुदानासाठी ‘हे’ शेतकरी असतील पात्र :-

Advertisement

राज्य सरकारच्या योजनेंतर्गत राज्यातील कित्येक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची दिनांक 30 जून पर्यंत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2018-19 मध्ये घेतलेल्या पीक कर्ज रकमेवर 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी 2018-19 मध्ये पीककर्ज घेतलेले आहे. पण ज्या शेतकऱ्यांची रक्कम ही 50 हजारापेक्षा कमी आहे. त्यांना कर्जा एवढ्या रकमेची मदत केली जाणार आहे.

Advertisement