SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एकनाथ शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर करणार दावा? कायदा काय सांगतो, वाचा मोठी घडामोड..

राज्यात राजकीय उलथापालथ पाहता आता अनेक तर्क वितर्क समोर आले आहेत. कोणी म्हणतं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी फोडलेल्या आमदारांचा गट भाजपामध्ये जाऊ शकतो, कारण भाजपाने अनेक पदं देण्याची ऑफर दिल्याचं सांगण्यात येतंय. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहीती नाहीये.

एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात भलताच ट्रेंड सुरू केल्याचं दिसलं. यामध्ये शिवसेनेत फूट पडल्याचं दिसलं खरं पण यामध्ये राज्यातील जनतेचे प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि समर्थक मात्र एकटे पडले.
असं होण्यामागची कारणे ही गेल्या अडीच वर्षांपासून होती का ? खरंच आमदारांनी अडीच वर्षे सहन केलं का? असे प्रश्न जरी लोकांना पडत असेल तरी संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना काल लिहिलेल्या पत्रात असंच म्हटलं आहे.

Advertisement

राज्यातील घडामोडी घडत असतानाच एकनाथ शिंदे मात्र शिवसेना पक्ष आता आपलाच करताय की काय, अशी खंत मात्र शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांना लागलीय. पण हे इतकं सोपं देखील नाहीये. एका रात्रीत आमदार फोडून पक्ष स्थापन करणं किंवा शिवसेनाच पुन्हा दुसऱ्या रुपात आणली जाणं, हे इतक्या लवकर शक्य नाही. कारण बहुतेक वेळा तडजोडीची भूमिका ही पक्ष टिकवून ठेवण्यासाठी घेतली जाते.

तसेच आताची शिवसेना आमदार फुटले जरी इतक्या स्वस्तात आपलं वर्चस्व संपवणार नाही. कारण हे राजकारण फक्त एका शिवसेनेपुरते नाहीये, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील महाआघाडी मध्ये आहेत. आता आणखी काय घडामोडी घडतील याकडे राज्याचं लक्ष लागलं असलं तरी एकनाथ शिंदे हे निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाण चिन्ह मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. तशा हालचाली देखील चालू आहेत, असं म्हटलं जात आहे.

Advertisement

शिवसेना, आमदार आणि धनुष्यबाण…

मिळालेल्या माहीतीनुसार, एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेनेचे 37 आमदार असणे आवश्यक आहे. या आमदारांना पक्षांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत अपात्र ठरवले जाण्यापासून वाचवले जाईल. शिंदे यांना 37 आमदार मिळाल्यास बंडखोर गटाकडे दोन पर्याय असतील- एक तर ते दुसर्‍या राजकीय पक्षात प्रवेश करू शकतात किंवा ते शिवसेनेतेच मोडतील. पण सध्याची भक्कम तयारी बघता एकनाथ शिंदे यांच्यावरून असं दिसतंय की ते शिवसेना तोडून म्हणा की सिद्ध करून पण निवडणूक आयोगात जाऊन शिवसेनेचे चिन्ह, झेंडा आणि पक्षाच्या नावावर दावा सांगू शकतात, असा अंदाज आहे.

Advertisement

ज्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेम, त्यांची पूर्वीची शिवसेना आणि हिंदुत्व यांबद्दल त्यांनी व आमदारांच्या गटाने आपली भूमिका मांडली आहे, यावरून शिवसेना पक्ष दुभंगणार असं दिसत आहे, याचाच अर्थ असा की जर एकनाथ शिंदे जर धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे गेले तर उद्धव ठाकरे गटालाही निवडणूक आयोगाकडे जावे लागणार आहे, ते म्हणजे आपलीही शिवसेनाच आहे, हे सिद्ध करण्यासाठी आणि हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असणार आहे. काही नेत्यांनी सर्व आमदार शिवसेनेत परत येतील असं देखील म्हणत आहेत”, अशी सर्व चर्चा आता सगळीकडे रंगली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement