SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एकदा पैसे भरल्यानंतर दरमहा मिळणार 12 हजार रूपये पेन्शन

मुंबई :

सेवानिवृत्तीनंतर आपलं जीवन सुखाचं जावं अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. त्यासाठी प्रत्येकजण विविध माध्यमांतून बचत करत असतो. सध्या बचत करण्यासाठी विविध प्रकारचे स्रोत उपलब्ध आहेत. सरकारी, सहकारी बॅंका आणि वित्तीय संस्था ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कायमचं बचत योजना आणत असतात. अशीच एक बचत योजना आता एलआयसीनं (LIC) लाँच केली आहे. या योजनेचं नाव सरल पेन्शन योजना (Saral Pension Yojana) असं आहे.

Advertisement

या योजनेच्या माध्यमातून वयाच्या 40 व्या वर्षापासून पेन्शन मिळू शकते. या योजनेसाठी किमान 40 वर्षं आणि कमाल वय 80 वर्षं अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. . एलआयसी सरल पेन्शन योजना ही एक नॉन-लिंक केलेली, सिंगल प्रीमियम योजना आहे.

या योजनेचा लाभ तुम्ही एकटे किंवा तुमच्या जोडीदारासोबत घेऊ शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळत राहील. ही पॉलिसी सुरु झाल्यानंतर सहा महिन्यांमध्ये सरेंडर करू सकता.

Advertisement

या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला कर्जाची सुविधा (Loan) मिळेल. पॉलिसी घेतल्यानंतर तुम्ही सहा महिन्यांनी कर्जासाठी अर्ज करू शकता. जर समजा तुम्हाला एखाद्या आजाराच्या उपचारांसाठी पैशांची गरज भासली तर तुम्ही पॉलिसीत जमा रक्कम परत मिळवू शकता.

एलआयसी सरल पेन्शन योजनेचा लाभ सिंगल लाईफ (Single Life) आणि जॉईंट लाईफ (Joint Life) या दोन्ही पद्धतीनं मिळू शकतो. सिंगल लाईफमध्ये पॉलिसी ही एकाच व्यक्तीच्या नावावर असते तर जॉईंट लाईफ (Joint Life) या प्रकारात पती आणि पत्नी अशा दोघांना एकाचवेळी पेन्शन मिळू शकते. सिंगल लाईफमध्ये पॉलिसी धारकाला आयुष्यभर पेन्शन मिळते. जॉईंट लाईफ या प्रकारात पती आणि पत्नी अशा दोघांना एकाचवेळी पेन्शन मिळू शकते.

Advertisement