SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

Amazon Monsoon Carnival Sale चा शेवटचा दिवस; 99 रुपयांमध्ये मिळणार ‘या’ वस्तू

ई-कॉमर्स साइट Amazon वर सध्या मान्सून कार्निव्हल सेल सुरु आहे. जर कोणाला मोबाईल खरेदी करायचा असेल तर या सेलमध्ये अनेक आकर्षक ऑफर मिळणार आहे. हा सेल 18 जूनपासून सुरु झाला आहे आणि 23 जून रोजी तो संपणार आहे. या सेलमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंवर बंपर डिस्काउंट देण्यात आला आहे. जर समजा तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर त्यावर 40 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे.

Amazon Monsoon Carnival Sale मध्ये तुम्ही अवघ्या 99 रुपये किंमतीपासून वस्तू विकत घेऊ शकता. खासकरून मोबाइल एक्ससेरीज तुम्हाला खूपच कमी किंमतीत मिळत आहेत. सेलमध्ये ICICI Bank क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रांजॅक्शनवर 10 टक्के डिस्काउंटचा फायदा घेता येईल. 99 रुपये किंमतीपासून Amazon Monsoon Carnival Sale मध्ये केबल आणि चार्जर, मोबाइल कव्हर, स्क्रीन प्रोटेक्टर मिळत आहे. क्रोमा कंपनीचा 10,000 एमएएचचा पॉवर बँक फक्त 499 रुपयात उपलब्ध आहे. PTron, Xiaomi, Ambrane सारख्या ब्रँड्सचे डिव्हाइस देखील बंपर डिस्काउंटमध्ये या सेलमध्ये मिळणार आहे. Amazon Monsoon Carnival Sale मध्ये हेडफोन्स अवघ्या 199 रुपये किंमतीपासून मिळत आहेत.

Advertisement

सेलमध्ये कूपनसह 25 टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. Boat, Realme, JBL सह अनेक ब्रँड्सच्या हेडफोन्सवर आणि इतर ऍक्सेसरीजवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. Amazon वर सुरू असलेल्या Monsoon Carnival Sale चा आजचा दिवस शेवटचा असणार आहे. त्यामुळे आकर्षक ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला त्वरित खरेदी करावी लागेल,अन्यथा चांगली संधी हातातून निसटून जाईल.

Advertisement