SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जगातली पहिली सोलर इलेक्ट्रिक कार आली! एकदा चार्ज केल्यावर 7 महिने टेन्शन नाही

मुंबई :

जगभरात मागच्या काही दिवसांपासून सातत्याने इलेक्ट्रिक कारचा वापर जास्तीत जास्त करण्यात यावा याबाबत विविध देश धोरणे स्पष्ट करत आहेत. इलेक्ट्रिक कारची सध्याची मागणी पाहता आता नेदरलँड्स कंपनी लाइटइयरने जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार (Lightyear Solar Electric Car) सादर केली आहे. वास्तविक पाहता कंपनीने जे उत्पादन तयार केलेले आहे, तेच वाहन स्वरूपात सादर केले आहे. कंपनीने लाइटइयर असं नाव या कारच आहे. ही कार सौर आणि विद्युत उर्जेवर चालणारी कार आहे.

Advertisement

कंपनीने दावा केला आहे की ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये 1000 किमी पर्यंत चालवता येते. हायवेवर 110किमी/ताशी वेगाने गाडी चालवल्यास गाडीची रेंज 560/तास इतकी कमी होईल. कंपनीने या कारच्या लाँचच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास 2.50 लाख युरो म्हणजेच 2 कोटी रुपये इतकी कारची किंमत आहे. कंपनीकडून आगामी काळात जी कार येणार आहे तिची किंमत 30,000 युरो म्हणजेच 27 लाख रुपये इतकी असेल. ही एक फॅमिली सेडान कार आहे.

या कारमध्ये पाच स्क्वेअर मीटरचे सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. ही कार एका दिवसात 70 किमीची रेंज देऊ शकते. वर्ल्डवाइड हार्मोनाइज्ड लाइट व्हेईकल टेस्ट प्रोसिजर या चाचणीदरम्यान या कारने 625 किमी अंतर पार केले होते.

Advertisement

विशेष म्हणजे हे काम या कारने केवळ 60 केडब्लूएच बॅटरी पॅकसह हे करून दाखवले होते. ही कार बनवण्यासाठी कंपनीला सहा वर्षांचा कालावधी लागला असं कंपनीनं म्हटलं आहे. कारवर गेल्या काही वर्षांत संशोधन आणि विकास, डिझाइन, अभियांत्रिकी, प्रोटोटाइपिंग आणि चाचणी केली गेली आहे

Advertisement