SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय? राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल का?

विधान परिषद निवडणुक निकालानंतर ठाकरे सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं नाराजीनाट्य केंद्रस्थानी आलं आहे. एकनाथ शिंदे शिवसेना सोडणार का? त्यांची नाराजी दूर होणार का? ते भाजपबरोबर जाणार का? अशा अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वाचा निर्माण प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीमध्येच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकार बरखास्तीच्या दिशेने असल्याचे मोठे संकेत दिले आहेत.

दरम्यान, मागील 2 दिवसापासून सुरु असलेल्या नाराजीनाट्य त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशावेळी राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय? हे जाणून घेऊयात तेही थोडक्यात..

Advertisement

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

राज्यामध्ये शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्‍य नसल्यास त्या संबंधित अहवाल राज्याचे राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिल्यास किंवा राष्ट्रपतींची स्वत:ची खात्री पटल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. केंद्र सरकारचे महत्त्वाचे निर्णय अंमलात नकार दिल्यानंतरही राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.

Advertisement

राष्ट्रपती राजवटीत राज्याचा कारभार कसा होतो?

▪️ राष्ट्रपती राजवट 2 महिन्यांच्या कालावधीसाठी असू शकते आणि केंद्र सरकारच्या ठरावाने वाढवला जाऊ शकतो
▪️ राज्यातील सर्व अधिकार राज्यपालांकडे एकवटतात
▪️ राज्याचे मुख्य सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्याचा कारभार हाकला जातो
▪️ या कालावधीत निर्णय घेण्याचे अधिकार संसदेकडे असतात.
▪️ नवीन कोणताही खर्च राज्यपालांना करता येत नाही
▪️ या काळात राज्य नाममात्र चालवण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
▪️ कल्याणकारी योजनांची घोषणा करता येत नाही
▪️ जीवनावश्यक प्रश्नांवर निर्णय घेण्याचे अधिकार राज्यपालांना असतात त्यासाठी राष्ट्रपती राजवटीची कोणतीही आडकाठी नसते. म्हणजे शेतकरी आत्महत्यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर ते निर्णय घेऊ शकतात.

Advertisement

याआधी राज्यात 2 वेळा राष्ट्रपती राजवट :

महाराष्ट्राच्या इतिहासात दोनवेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे. 1980 आणि 2014 मध्ये महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीखाली गेलं होतं. 1978मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचं सरकार होतं. हे सरकार बरखास्त करून तेव्हा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे 17 फेब्रुवारी ते 9 जून 1980 या काळात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

Advertisement

तर, 2014 मध्येही महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीखाली गेलं. ही राष्ट्रपती राजवट 32 दिवसांसाठी होती. राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळलं होतं व त्यानंतर 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 यादरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

Advertisement