बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) , अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांचा बहुचर्चित ‘शमशेरा’ (Shamshera) चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आता आज या सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित झाला आहे.
संजय दत्तच्या लूकने आणि रणबीरच्या ‘सांसों में तूफानों का डेरा, निगाहें जैसे चील का पहरा। कोई रोक ना पाएगा इसे, जब उठे ये बनके सवेरा।’ या धमाकेदार डायलॉगने टीझरची सुरुवात होताना दिसतेय. तो खाकी वर्दीमध्ये सामान्य लोकांवर अत्याचार करतांना दिसत आहे. मग त्याचवेळी घोड्यावर स्वार होऊन येणाऱ्या ‘डाकू’ रणबीर कपूरची एन्ट्री झाली की अजून ही एंट्री देखील तुम्हाला हादरवून टाकणारी वाटेल.
शमशेरा चे दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केलं आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, वाणी कपूर, संजय दत्त, आशुतोष राणा, रोनित रॉय आणि सौरभ शुक्ला यांच्याही तोडीस तोड भूमिका आहेत. चित्रपट तयार करण्यासाठी तब्बल 150 कोटींच्या जवळपास बजेट लागले आहे. हा जबरदस्त चित्रपट येत्या 22 जुलैला सिनेमागृहात रिलीज होणार आहे, तर त्याआधी येत्या 24 जूनला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.
अभिनेता रणबीर कपूरच्या आवाजामध्ये सिनेमातील संवाद हा अंगावर शहारे आणणारा बनला आहे. या रिलीज झालेल्या जबरदस्त ट्रेलरमध्ये दृश्ये थरारक दाखवली आहेत. शमशेरा’मध्ये रणबीर कपूर आणि संजय दत्त यांच्यात बरेच फायटिंग सीन आहेत. घोड्यावर बसून शूट केले आहेत आणि यासाठी रणबीरनं घोडेस्वारीचं ट्रेनिंग देखील घेतलं आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच रणबीर कपूर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या एका व्यक्तीरेखेचं नाव शमशेरा तर दुसऱ्या व्यक्तीरेखेचं नाव बल्ली असं असणार आहे, असं म्हटलं जात आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy