SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टीम इंडियाला मोठा धक्का, भारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण..!

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. इंग्लडविरुद्ध येत्या 1 जुलैपासून कसोटी सामना सुरु होणार आहे.. मात्र, त्याआधीच भारतीय संघासाठी वाईट बातमी आहे. भारताचा माजी कॅप्टन व मुख्य फलंदाज विराट कोहली याची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आलीय. शिवाय, इतर खेळाडूंनाही कोरोना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे..

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 1 जुलैपासून बर्मिंगहॅम येथे एकमेव कसोटी सामना होणार आहे. त्याआधी 24 जूनपासून लिसेस्टर काउंटी संघाविरुद्ध भारतीय संघाचा सराव सामना खेळला जाणार आहे. मात्र, त्याआधीच विराट कोहलीला कोरोनाची लागण झाल्यानं हा सामनाही अडचणीत आला आहे..

Advertisement

अश्विन कोरोनातून सावरला

दरम्यान, याआधी भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर. अश्विन यालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो बाकीच्या खेळाडूंसोबत लंडनला गेला नव्हता. मात्र, आता तो कोरोनातून बरा झाला असून, सराव सामन्यापूर्वी तो लिसेस्टरला पोचण्याची आशा आहे. मात्र, त्याआधीच विराटची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

Advertisement

‘आयपीएल’नंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी विराटसह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत विराट कोहली हा मालदिवला फिरायला गेला होता. नंतर तो संघासोबत लंडनला रवाना झाला. तेथेही विराट व रोहित शर्मा हे चाहत्यांसोबत फोटो काढताना दिसले होते. त्यावरुन ‘बीसीसीआय’ने नाराजी व्यक्त केली होती.

दुसरीकडे इंग्लंड क्रिकेट संघाचा फलंदाज प्रशिक्षक मार्कस ट्रेस्कोटिक यालाही कोरोनाची लागण झाल्याचे इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाने सांगितले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याचीही तब्बेत बरी नाही. मात्र, त्याचा कोरोना रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आलाय, पण तो सराव सत्रात सहभागी झाला नव्हता. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत तो खेळण्याची शक्यता कमी आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली फाॅर्मसाठी झगडताना दिसत आहे. ‘आयपीएल’मध्येही त्याची बॅट शांतच होती. त्यामुळे यंदाचा इंग्लड दौरा त्याच्यासाठी खडतर असणार, असं बोललं जात आहे. त्याला कोरोनाची लागण झाली असली, तरी आता तो बरा असल्याचे समजते. त्यामुळे तो कसोटीसाठी उपलब्ध असेल, असं सांगण्यात आलं..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement