SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): तुमच्यातील खळखळता उत्साह जागृत ठेवावा. कामाचा ताण जाणवेल. वेळेचे नियोजन केल्यास बर्‍याच गोष्टी जमून येतील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. माल हातोहात खपेल. हाती पैसा येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला थोड्या अडचणी येतील. मात्र त्या लवकरच दूर होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. योग्य मार्गदर्शन मिळेल. मात्र संयम सोडू नका. थोडे शांत चित्ताने कामे करण्याची गरज आहे. घरी पाहुणे येतील.

वृषभ (Taurus): प्रेमातील जवळीक जोपासावी. मुलांशी किरकोळ कारणावरून वाद संभवतात. स्वत:च्या करमणुकीचा मार्ग शोधावा. जुन्या गोष्टींमध्ये फार काळ रेंगाळू नका. अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळावा. विविध प्रकारचे लाभ होतील. मात्र देण्या-घेण्याचे व्यवहार जपून करा. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. भावंडांच्या सहवासात याल. चांगले बोलणे होईल. नोकरीत थोड्या अडचणी येतील. काही सहकारी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील.

Advertisement

मिथुन (Gemini) : दिवसभर कामाची गडबड राहील. आपली मनस्थिती गोंधळलेली राहू शकते. कामाचे व्यवस्थित मूल्यमापन करावे. एकाच वेळी अनेक कामात हात घालू नये. इतरांना स्वखुशीने मदत कराल. काही लोक तुमच्या विरोधात कारवाया करतील. मात्र तुम्हाला त्यातून काही नुकसान होणार नाही. उलट कारवाया करणारे लोकच उघडे पडतील आणि तुमचे पारडे जड होईल.

कर्क (Cancer) : घरगुती कामात अधिक वेळ जाईल. मित्रमंडळींमध्ये खोडकरपणा कराल. दिवस मजेत घालवाल. हातातील अधिकाराचा वापर करावा. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. कामाचा फार ताण घेऊ नका. घरात ताणतणाव निर्माण होईल. नेमका काय निर्णय घ्यावा याचा अंदाज येणार नाही. एखाद्या हित चितकाचा सल्ला घ्या. जोडीदाराशी मतभेद होतील धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

Advertisement

सिंह (Leo) : मुलांच्या चंचलतेकडे बारीक लक्ष ठेवावे. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. आततायीपणे कोणतेही काम करू नये. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. कामाचा ताण वाढू शकतो. काहींना प्रवास करावा लागेल. मनात आनंदी विचार राहतील. तणाव दूर होतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे मार्गी लागतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील विविध प्रकारचे फायदे होतील उच्च अधिकार मिळतील.

कन्या (Virgo) : मानसिक चंचलता जाणवेल. विचारांच्या गर्दीत वाहून जाऊ नका. भावंडांची मदत घेता येईल. जवळच्या ठिकाणी फेरफटका मारून यावा. आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. चांगल्या पुस्तकांचे वाचन करा नोकरीत बदल होतील नोकरीत वाद वाढवू नका. घरी लोकांची ये-जा चालू राहील. जवळच्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळतील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. आवडत्या छंदासाठी वेळ काढा.

Advertisement

तुळ (Libra) : नोकरदारांचा मान वाढेल. नवीन स्नेहसंबंध जुळून येतील. जवळच्या लोकांची गाठ पडेल. लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. सप्ताहाच्या प्रारंभी तब्येत थोडी नरम गरम राहील. उन्हात जास्त फिरू नका. प्रवास करणे होता होईल तो टाळा. वाहने जपून चालवा. वेगाच्या मर्यादेकडे लक्ष द्या. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. सप्ताहाच्या उत्तरार्धात अनुकूल परिस्थिती राहील.

वृश्‍चिक (Scorpio) : तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. सारासार विचार करूनच मग कृती करावी. हातापायांच्या किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही साहस करतांना घाई करू नका. प्रवासात खबरदारी घ्यावी. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. त्यांना चांगल्या संधी मिळाल्याने तुमचा जीव भांड्यात पडेल. नोकरीत दगदग होईल. कामाचे स्वरूप बदलेल. त्यामुळे नवीन कामाशी जुळवून घेताना त्रेधातिरपीट उडू शकते.

Advertisement

धनु (Sagittarius) : मानसिक अस्थिरता जाणवेल. भावनेच्या अति आहारी जाऊ नका. वैचारिक गोंधळ उडू शकतो. आर्थिक आवक चांगली राहील. एखाद्या मोठ्या व्यवहारात फायदा होईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. घरी पाहुणे येतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे झाल्यासारखे होईल विविध प्रकारचे तणाव जाणवतील. सावधपणे कामे करा. व्यवसायात विक्री चांगली राहील.

मकर (Capricorn) : आपण स्वत:च आपल्या त्रासाला कारणीभूत ठरू शकाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. भावंडांना मदत करता येईल. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक करतांना संपूर्ण विचार करावा. अकारण मनात धागधूग राहील. काही कारणाने गैरसमज होतील. काळजी वाटत राहील. धार्मिक कार्यात मन रमेल. हातून दानधर्म पूजापाठ घडतील. त्यासाठी वेळ आणि पैसा खर्च केला जाईल.

Advertisement

कुंभ (Aquarious) : आपल्याचा शब्दावर ठाम राहाल. दिवस मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. क्षणिक गोष्टींनी खुश व्हाल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे. थोडा स्वत:साठी वेळ काढावा. मागील गोष्टींची पुनरावृत्ती टाळावी. जोडीदाराच्या वागण्याचे आश्चर्य वाटू शकते. आर्थिक आवक चांगली राहील. जुनी येणी वसूल होण्यात अडचणी येतील. काहींना प्रवास करावा लागेल. खर्च वाढतील. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे.

मीन (Pisces) : चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. नसत्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. फक्त आपल्याच कामाशी मतलब ठेवून वागावे. कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. नोकरीत अनुकूल बदल होतील. आर्थिक आवक चांगली राहील. विविध प्रकारचे लाभ होतील पर्यटनाच्या निमित्ताने आठवड्याच्या शेवटी प्रवास होईल. घरी पाहुणे येतील.

Advertisement