SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

iphone प्रेमींसाठी खुशखबर; ‘असा’ असेल iphone 14

यावर्षी सप्टेंबर महिन्यात Apple आपले फ्लॅगशिप मॉडेल iPhone 14 ला लाँच करणार आहे. मात्र, या फोनच्या लाँचिंगच्या आधीपासूनच iPhone 14 ची सर्वाधिक चर्चा आयफोनप्रेमीमध्ये आहे. Apple दरवर्षी आयफोनचे नवीन मॉडेल लाँच करत असते. त्यामुळे आता आयफोन 13 नंतर आयफोन 14 कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयफोन 14 हा स्मार्टफोन 14 सप्टेंबर 2022 रोजी लाँच होण्याची शक्यता असून या स्मार्टफोनबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही परंतु लीकद्वारे बरेच काही कळले आहे. आयफोन 14 चे चार प्रकार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro Max आणि iPhone 14 Pro हे चार सोबत हा बदल पाहायला मिळू शकतो.

Advertisement

लीक झालेले iPhone 14 चे काही फीचर्स?

रिपोर्टनुसार, अ‍ॅपल पूर्वीप्रमाणेच, iPhone 14 मॉडेल्सच्या डिस्प्लेसाठी LG, Samsung आणि BOE सोबत भागीदारी करत असून आयफोन 14 च्या चारही मॉडेल्समध्ये OLED डिस्प्लेचे दोन प्रकार दिले जातील. तर iPhone 14 आणि iPhone 14 Max मध्ये LTPS OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तर ज्यामध्ये iPhone 14 चा डिस्प्ले 6.1-इंचाचा आणि iPhone 14 Max चा डिस्प्ले 6.9-इंचाचा असेल. या दोन्ही फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट खूप जास्त असणार आहे.

Advertisement

तर दुसरीकडे, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max LTPO OLED डिस्प्लेसह लाँच केले जाऊ शकतात. या दोन मॉडेल्समध्ये व्हेरिएबल रिफ्रेश रेट (VRR) फीचर आणि ऑलवेज-ऑन डिस्प्ले फीचर देखील दिले जाऊ शकते.

दरम्यान, कंपनीकडून अद्याप कोणत्याही फीचरबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे यातील काही फीचर्समध्ये बदल देखील होऊ शकतो.

Advertisement