SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ड्रायव्हिंग लायसन्सपासून झाली सुटका! करावं लागेल ‘हे’ छोटसं काम

मुंबई :

आपल्याला सार्वजनिक ठिकाणी वाहतूक करत असताना एक महत्वाची गोष्ट सोबत लागते ती म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स. जर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर निश्चितच त्याचा तोटा आपल्याला दंड किंवा कारवाई स्वरूपात होऊ शकतो. अनेकवेळा आपल्याकडून चुकून किंवा नकळत ड्रायव्हिंग लायसन्स सोबत घेणे शक्य होत नाही किंवा आपण विसरून जातो. नेमकं अशाच वेळी पोलिसांनी आपल्याला पकडल्यानंतर पोलीस आपल्यावर कारवाई करतात आणि दंड वसूल केला जातो. जर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर आपल्याकडून 5000 रुपयांपर्यंत चलन कापलं जातं.

Advertisement

इथून पुढे आपल्यालाही या कारवाईपासून वाचायचे असेल तर आता काळजी करण्यासारखे काही नाही. डिजीलॉकर नावाचं एक अ‍ॅप आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं लायसन्स अपलोड करावं लागेल. डिजीलॉकरमध्ये तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला प्रवासात किंवा इतर कुठेही जाताना लायसन्स सोबत घेऊन जाण्याची गरज नाही. जर समजा प्रवास करताना तुम्हाला पोलिसांनी अडवलं आणि तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची विचार केली तर तुम्ही डिजीलॉकरमध्ये अपलोड केलेलं DL दाखवू शकता. यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही किंवा तुमच्यावर कारवाई देखील होणार नाही.

बऱ्याच जणांना डिजीलॉकर काय आहे? याबद्दल माहिती नाही. तर डिजीलॉकर हे साधारण अ‍ॅप नसून ते एक सरकारी अ‍ॅप आहे. ज्या भारतीय नागरिकांना त्यांची महत्वाची कागदपत्रे कागदविरहित पद्धतीने त्यांच्याकडे ठेवायची आहे त्यांच्यासाठी खास हे अँप तयार करण्यात आले आहे. पोलीस त्यात अपलोड केलेली कागदपत्रे स्वीकारतात आणि तुमचे चलन कापले जाणार नाही.

Advertisement