SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भाजपच्या गोटात हालचाली! आदित्य ठाकरेंचं मंत्रिपद जाणार? विधानसभा बरखास्तीच्या दिशेने..?

राज्याच्या आणि शिवसेनेच्या आपापसांतील नेत्यांत सध्या खळबळ होत असताना भाजपाने रात्री 2 वाजेपर्यंत बैठक घेतली आणि त्यानंतर राजकारणाच्या हालचालीत आता भाजपाने देखील वेग धरला आहे. आज दुपारपर्यंत कधीही मुंबईत बैठक किंवा काही महत्वाचे निर्णय होऊ शकतात. असं भाजपाकडून सांगण्यात आलं आहे. भाजपच्या सर्व आमदारांना भाजपा पक्षश्रेष्ठींकडून पुढचे 48 तास संपर्कात राहण्याच्या, कोणत्याही दौऱ्यावर आणि परदेशात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आजच्या नियोजनानुसार ते आज मुंबईत येण्याची शक्यता आहे. दरम्यान शिंदे आणि जवळपास 40 पेक्षा जास्त आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये आहेत. तर दुसरीकडे भाजपाने देखील आपल्या आमदारांना कोणत्याही क्षणी तुम्हाला मुंबईत पोहोचायला लागू शकतं, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पोहोचले आहेत, यामुळे भाजपच्या प्रमुख नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होऊ शकते, अशी माहीती आहे.

Advertisement

आदित्य ठाकरे राजीनामा देणार..?

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या ‘ आमदार बंडानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विटर हँडलवरून पर्यावरण मंत्री पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या शिवसेनेच्या बैठखीत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचलीय. या साऱ्या घडामोडींच्य पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आज भेट होण्याची शक्यताय.

Advertisement

संजय राऊत यांचं खळबळजनक ट्विट..

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे ठाकरे सरकार धोक्यात आलं आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटने मोठी खळबळ उडाली आहे. ‘महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने’, असं त्यांनी ट्विट केलंय. त्यामुळे आजच मुख्यमंत्री मोठा निर्णय घेऊ शकतात. ते विधानसभा भंग करण्याची शिफारस करू शकतात.

Advertisement

तत्पुर्वी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार शिवसेनेत परत येतील, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. “हा आमच्या घरातील विषय आहे, शिंदे यांच्यासोबत आमची सकारात्मक चर्चा सुरु आहे, सकाळी मी तासभर शिंदे यांच्याशी फोनवरुन बोललो, शिंदेंनी कोणत्याही अटी-शर्ती ठेवल्या नाहीत”, असे राऊत यांनी सांगितले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

Advertisement

राज्यातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा चार्ज कोणत्याही दुसऱ्या राज्यपालांकडे सोपवलेला नाही, असं स्पष्टीकरण राजभवनकडून देण्यात आलं आहे. भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याने गोव्याच्या राज्यपाल श्रीधरण यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण राजभवनने स्पष्टीकरण देत हे वृत्त फेटाळलं आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement