SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ दिग्गज मराठी अभिनेत्याचा घटस्फोट..? बाॅलिवूडचे वारे मराठी चित्रपटसृष्टीतही…!!

गेल्या काही दिवसांत बाॅलिवूडमध्ये अनेक जोडप्यांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याचं दिसत आहे.. अरबाज खान, आमिर खान नंतर काही दिवसांपूर्वीच सोहेल खान याचा घटस्फोट झाला होता. बाॅलिवूडमध्ये वाहत असलेले घटस्फोटाचे हे वारे मराठी चित्रपटसृष्टीतही आल्याचे दिसत आहे..

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव व त्याची पत्नी तृप्ती हे एकमेकांपासून लवकरच विभक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे. सिद्धार्थची पत्नी तृप्तीनं तिच्या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवरुन ‘जाधव’ हे आडनाव हटवले असून, ‘तृप्ती अक्कलवार’ असं नाव ठेवलं आहे. त्यामुळे या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वीच पत्नी तृप्ती व दोन मुलींसोबत सिद्धार्थ जाधव हा ट्रीपवर गेला होता. त्यावेळी त्यानं केवळ मुलींसोबतचे फोटो शेअर केले होते. यावेळी पत्नी तृप्ती तिथे का नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला नि तिथूनच या चर्चांना सुरुवात झाली. त्यामुळे या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचे बोलले जात आहे..

 

Advertisement
View this post on Instagram

 

A post shared by Trupti V Akkalwar (@truptiakkalwar)

Advertisement

सिद्धार्थ-तृप्तीचं लग्न
सिद्धार्थ व तृप्ती यांनी 2007 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांना ‘स्वरा’ आणि ‘इरा’ अशा दोन मुली आहेत. सिद्धार्थ व तृप्तीनं ‘झलक दिखला जा’ या टीव्ही शोमध्येही सहभाग घेतला होता. या शोमधील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली होती.. सिद्धार्थ कायम पत्नीबद्दल भरभरून बोलत असतो. मग, त्यांच्यात नेमकं काय बिनसलं, याची चर्चा सुरु आहे.

Advertisement

गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ व तृप्ती हे एकत्र राहत नाहीत. अर्थात, याबाबत सिद्धार्थ किंवा तृप्ती यांच्यापैकी कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.. मात्र, त्यांच्या नात्याला तडा गेलाय, ही गोष्टही तितकीच खरी.. दरम्यान, लवकरच सिद्धार्थचा ‘दे-धक्का-2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थसोबतच मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम यांच्याही प्रमुख भूमिका असल्याचे सांगण्यात आले..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement