SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

LIC चं गृहकर्ज महागलं

जर तुम्हीही नवीन घर घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एलआयसीने (LIC Home Loan Rates) आता गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी वाढ केली असल्यामुळे आता ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केल्यानंतर सर्व बँका आणि कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी व्याज दरात वाढ केली असल्याचे समोर आले आहे.

नेमकी किती वाढ झाली?

▪️ LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेडने आपल्या होम लोन वरील व्याजदरात (LHPLR) 0.60 टक्क्यांनी वाढ केली आहे. म्हणजे आता व्याजदर हा 7.50 टक्के इतका झाला आहे.

▪️ एलआयसी गृहकर्जावरील नवीन व्याज दर हा 20 जून 2022 पासून लागू करण्यात आला असून एलएचपीएलआर हा प्रत्यक्षात मानक व्याज दर आहे. याच्यासोबत तो एलआयसी गृहकर्जाचा व्याजदर जोडलेला आहे.

▪️ एलआयसी एचएफएलचे एमडी वाय विश्वनाथ गौर यांनी सांगितले की, “ही दर वाढ सध्याच्या बाजारातील परिस्थितीशी सुसंगत अशी आहे. मात्र व्याजाचे हे दर अजूनही खूप स्पर्धात्मक आहेत. त्यामुळे होम लोनची मागणी स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.”

गेल्या महिन्यातही झाली होती वाढ
एलआयसीने मे महिन्यातही व्याजदरात वाढ केली होती. कंपनीने अखेरच्या क्रेडिट स्कोअरनुसार व्याजदरात वाढ केली होती. 700 च्या वरील ग्राहकांसाठी सुरुवातीच्या गृहकर्ज दरात 20 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली. यानंतर नवीन दर 6.9 टक्के करण्यात आला. त्यावेळी, कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांसाठी 25 बेसिस पॉइंट्स वाढवण्यात आले. हे दर 13 मे पासून लागू करण्यात आले होते.

Advertisement