SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

Jio चा जबरदस्त प्लान; Amazon Prime, Hotstar, Netflix मिळणार मोफत

मुंबई :

देशात सध्या टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओ कंपनीचा बोलबाला आहे. याच कंपनीच्या जीवावर सध्या रिलायन्स जिओचे मालक मुकेश अंबानी हे आशिया खंड आणि जगभरातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत नाव मिळवत आहे. रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना देणाऱ्या आकर्षक प्लॅनसाठी फेमस आहे.

Advertisement

रिलायन्स जिओच्या प्रीपेड प्लॅनअंतर्गत आता ग्राहकांना OTT अँप्सचा आनंद घेता येणार आहे. या प्लानमध्ये तुम्हाला Amazon Prime Video, Disney + Hotstar, Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. फक्त सबस्क्रिप्शनचं नाही तर एक महिन्यासाठी भरपूर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचे फायदेही मिळणार आहेत. या प्लॅनची किंमत असणार आहे Rs 399 आणि हा एक पोस्टपेड प्लॅन असणार आहे.

रिलायन्स जिओचा हा पोस्टपेड प्लॅन अत्यंत कमी किंमतीत ग्राहकांना मिळत आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल्स सोबत एसएमएस फायदे देखील दिले जातात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 75GB हाय स्पीड डेटादेखील मिळणार आहे. त्यानंतर 10/GB शुल्क आकारले जाईल. इंटरनॅशनल रोमिंगचा पर्यायही कंपंनीने या प्लॅनमध्ये दिला आहे. यासोबतच जिओ टीव्हीवर आणि इतर जिओ ऍप्सचा लाभ ग्राहकांना या प्लॅनद्वारे घेता येणार आहे.

Advertisement

जर कोणी OTTचे सबस्क्रिप्शन घेणार असेल तर निश्चितच ते हा प्लॅन खरेदी करू शकता. कारण एका OTTचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी महिन्याकाठी 200, 129, 100 रुपये अशी किंमत मोजावी लागते. जर जिओचा पोस्टपेड प्लॅन खरेदी केला तर एकाच प्लॅनमध्ये आपल्याला अनेक OTTचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच ग्राहकांना या प्लॅनद्वारे फायदा मिळू शकतो.

Advertisement