SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : ‘मुख्यमंत्री पद सोडायला तयार; पण….’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान…

राज्याच्या राजकारणात सुरु असलेल्या गोंधळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी पहिल्यांदाच भाष्य केलं.. ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना, त्यांनी आपण या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार असल्याचे सांगितले.. मात्र, त्यासाठी शिवसैनिकांनी समोर येऊन तसं सांगाव, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं..

ते म्हणाले, की “काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे लोक म्हणाले असते, की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, तर ते ठिक आहे.. पण मला या गोष्टीचं दु:ख वाटतंय, की माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदी नको आहे. सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा माझ्यासमोर सांगा, तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको, मी लगेच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे..”

Advertisement

माझ्याच लोकांना मी नकोय…
“मला कोणताही मोह नाही, मी राजीनामा द्यायला तयार आहे, परंतु, ज्यांना मी नकोय, त्यांनी माझ्यासमोर येऊन बोलावं. समोर येऊन बोलला, तर आज संध्याकाळीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो.. मुख्यमंत्री पद व शिवसेना पक्षप्रमुख पदही मी सोडायला तयार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, तर मला आनंदच आहे. पण समोर येऊन सांगा… मी आव्हानांना तोंड देणारा माणूस आहे..” असे ठाकरे म्हणाले.

ते म्हणाले, की “काँग्रेस-राष्ट्रवादीनं माझ्यावर विश्वास ठेवला, आजही काॅंग्रेसचे कमलनाथ यांनी फोन केला, शरद पवारांनी आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले..पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदी नको असेन, तर काय करायचं? गायब झालेल्या आमदारांनी इथं यावं व माझ्या राजीनाम्याचं पत्र घेऊन राजभवनात जावं..”

Advertisement

मी अगतिक नाही..
“मी कुठेही अगतिक नाही, लाचारीचा प्रसंग नाही, मजबुरी तर अजिबात नाही, कारण आजपर्यंत सत्ता नसतानाही अशी अनेक आव्हानं पेलली आहेत.. ज्या शिवसैनिकांना वाटत असेल, मी शिवसेनेचं नेतृत्त्व करायला नालायक आहे, तर पक्षप्रमुख पदही सोडायला तयार आहे, पण हे सांगायला विरोधक नको, शिवसैनिक हवा. कारण, मी शिवसैनिकाला बांधील आहे…”

“काही दिवसांपूर्वी माझ्यावर शस्रक्रिया झाली. त्यानंतरची दोन-तीन महिने फार विचित्र होते. मी कुणाला भेटू शकत नव्हतो. त्यामुळे अनेक जण मुख्यमंत्री भेटू शकत नसल्याचे बोलत होते. ते बरोबरही होते..”

Advertisement

“शिवसेना व हिंदुत्वाची नाळ घट्ट आहे. शिवसेना कदापि हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही.. शिवसेना कुणाची आहे? काही जण असं भासवत आहेत, की आता बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. मी असं काय केलंय, की शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर चाललीय,” असा सवालही ठाकरे यांनी केला..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement