SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

म्हणून एकनाथ शिंदे नाराज; वाचा संपूर्ण प्रकरण

विधान परिषद निवडणुकांच्या निकालानंतर चर्चेचा रोख नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नॉट रिचेबल असण्याकडे वळला आहे. संध्याकाळनंतर एकनाथ शिंदे कोणाच्याच संपर्कात नसल्याची चर्चा सुरू झाली. मंगळवारी सकाळी एकनाथ शिंदे सूरतला असल्याची बातमी थडकली आणि महाविकास आघाडीच्या गोटात भूकंप पडला.
राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि अजूनही शिवसेनेसोबतच आहोत, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.
दुसरीकडे, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांना अनेक दिवसांपासून उधाण येत होते. शिंदे यांच्यासह 30 हुन अधिक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. परंतू नक्की शिंदे का नाराज आहेत यावर एक नजर…

मंत्री एकनाथ शिंदेमध्ये एवढी नाराजी का?

1. उद्धव ठाकरेंच्या पुत्र प्रेमामुळे नाराज
महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे सर्वात मोठे मंत्री आहेत. परंतू त्याऐवजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र अदित्य ठाकरे यांना झुकते माप दिले जात असल्याचे बोलले जात आहे.
2. आदित्य ठाकरेंकडे अधिक अधिकार असल्यानं नाराज 
महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री असूनदेखील त्यांच्याऐवजी अदित्य ठाकरे यांना जास्त अधिकार असल्याने आपल्याला डावलले जात असल्याची भावना शिंदे यांची आहे.
3. निर्णय प्रक्रियेत स्थान न दिल्यानं नाराज
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिपदाचा तिजोरीसारखा वापर करण्यात येतो. परंतू पक्षाच्या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत स्थान न दिल्याने शिंदे नाराज असण्याची शक्यता.
एकनाथ शिंदेंसोबत कोणते आमदार असण्याची शक्यता?
मराठवाडा : 
1. सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
2. पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
3. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
4. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
5. वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
6. नांदेडचे बालाजी कल्याणकर
कोकण 
1. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी
2. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे
3. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले
पश्चिम महाराष्ट्र 
1. आटपाडीचे आमदार अनिल बाबर
2. भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर
3. पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
4. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
5. साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे
ठाणे  
1. अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर
2. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा
3. भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे
4. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर
उत्तर महाराष्ट्र  
1. पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील
विदर्भ 
1. मेहकरचे आमदार संजय रायमुलकर
2. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड