SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कागद नाही, तर ‘या’ खास वस्तुंपासून तयार होते भारतीय नोट

आपण रोजच्या व्यवहारात चलनी नोटांचा वापर करतो. या चलनी नोटा कागदाच्या असल्याचं आपल्याला वाटतं. मात्र या नोटा तयार करण्यासाठी कागदाचा वापर केला जात नाही, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, भारतासह इतर अनेक देशांचे चलन बनवण्यासाठी कॉटनचा वापर केला जातो. कॉटन वजनाने हलक, दीर्घकाळ टिकणारे आणि छापण्या योग्य असल्याने त्याचा वापर केला जातो. आरबीआयच्या म्हणण्यानुसार भारतीय नोट छापण्यासाठी 100% कॉटन वापरला जातो.

Advertisement

तसेच चलनी नोटा बनवण्यासाठी, कापूस, लिनन आणि इतर गोष्टींचे प्रमाण गुप्त ठेवले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 च्या कलम 22 नुसार, भारतात नोटा जारी करण्याचा एकमेव अधिकार फक्त रिझव्‍‌र्ह बँकेला आहे, म्हणजेच जर कोणी तसे करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. भारतीय चलनात सध्या 5, 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या चलनी नोटा आहेत.

अमेरिका सुद्धा अशाच फॉर्म्युल्याचा केला जातो वापर –
अमेरिका देखील आपल्या करन्सी नोटा तयार करण्यासाठी अशाच प्रकारचा फॉर्म्युला वापरते. एका रिपोर्टनुसार, अमेरिका 75% कॉटन आणि 25% लिननचा वापर होतो

Advertisement