SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): कौटुंबिक कलह शांततेने सोडवावा. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. काही लोक तुमच्या विरोधात कारवाया करतील. मात्र तुम्हाला त्यातून काही नुकसान होणार नाही. उलट कारवाया करणारे लोकच उघडे पडतील आणि तुमचे पारडे जड होईल. काहींना प्रवास करावा लागेल. मनात आनंदी विचार राहतील.

वृषभ (Taurus): अडचणीतून वेळीच मार्ग निघेल. सहकार्‍यांची योग्य वेळी मदत मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. मनातील काळजी दूर होईल. तणाव दूर होतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे मार्गी लागतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील विविध प्रकारचे फायदे होतील उच्च अधिकार मिळतील.

Advertisement

मिथुन (Gemini) : चारचौघांत मिळून मिसळून वागाल. मनाप्रमाणे हौस पूर्ण करून घ्याल. काम व वेळ यांचे गणित जमवावे लागेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. अनावश्यक खर्च टाळावा. चांगल्या पुस्तकांचे वाचन करा नोकरीत बदल होतील नोकरीत वाद वाढवू नका. घरी लोकांची ये-जा चालू राहील. जवळच्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळतील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. आवडत्या छंदासाठी वेळ काढा.

कर्क (Cancer) : धार्मिक ग्रंथ वाचाल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. फक्त कामावरच लक्ष केंद्रीत करावे. वरिष्ठांच्या नाराजीचे कारण बनू नका. दिरंगाईतून मार्ग काढावा लागेल. कामाचा फार ताण घेऊ नका. घरात ताणतणाव निर्माण होईल. नेमका काय निर्णय घ्यावा याचा अंदाज येणार नाही. एखाद्या हितचिंतकाचा सल्ला घ्या. जोडीदाराशी मतभेद होतील धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

Advertisement

सिंह (Leo) : हातातील वेळेचा सदुपयोग करा. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहार जपून करावेत. उगाचच चीड-चीड करू नका. नसते साहस अंगाशी येऊ शकते. थोडे शांत चित्ताने कामे करण्याची गरज आहे. घरी पाहुणे येतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक आवक चांगली राहील. जुनी येणी वसूल होण्यात अडचणी येतील. काहींना प्रवास करावा लागेल. खर्च वाढतील. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे.

कन्या (Virgo) : चैनीच्या वस्तू खरेदी कराल. व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने खुश राहील. जवळचे मित्र भेटतील. मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील. मनातील अपेक्षा पूर्ण होतील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. त्यांना चांगल्या संधी मिळाल्याने तुमचा जीव भांड्यात पडेल. नोकरीत दगदग होईल. कामाचे स्वरूप बदलेल. त्यामुळे नवीन कामाशी जुळवून घेताना त्रेधातिरपीट उडू शकते. थोडे शांत चित्ताने कामे करण्याची गरज आहे.

Advertisement

तुळ (Libra) : कामातून आनंद मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कामातील सुसंगतता व स्थैर्य जपाल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद लाभेल. कामाच्या ठिकाणी तुमचा मान वाढेल. व्यवसायात भरभराट होईल. माल हातोहात खपेल. हाती पैसा येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला थोड्या अडचणी येतील. मात्र त्या लवकरच दूर होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. योग्य मार्गदर्शन मिळेल. मात्र संयम सोडू नका. सावधपणे कामे करा.

वृश्‍चिक (Scorpio) : कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. अनाठायी खर्च केला जाईल. कलात्मक दृष्टिकोन ठेवावा. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल. घरी पाहुणे येतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक आवक चांगली राहील. जुनी येणी वसूल होण्यात अडचणी येतील. काहींना प्रवास करावा लागेल. खर्च वाढतील. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे.

Advertisement

धनु (Sagittarius) : मुलांचे वागणे बिनधास्त वाटू शकते. आपले कलागुण जतन करण्याचा प्रयत्न करावा. बोलतांना इतरांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. संयम सोडू नका. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. त्यांना चांगल्या संधी मिळाल्याने तुमचा जीव भांड्यात पडेल. नोकरीत दगदग होईल. कामाचे स्वरूप बदलेल. त्यामुळे नवीन कामाशी जुळवून घेताना त्रेधातिरपीट उडू शकते.

मकर (Capricorn) : जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. मित्रमंडळींचा गोतावळा जमवाल. वादाचे मुद्दे लांब ठेवावेत. सामुदायिक जाणीव जागृत ठेवावी. हाती घेतलेले काम तडीस न्याल. आर्थिक आवक चांगली राहील. एखाद्या मोठ्या व्यवहारात फायदा होईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. घरी पाहुणे येतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे झाल्यासारखे होईल विविध प्रकारचे तणाव जाणवतील.

Advertisement

कुंभ (Aquarious) : गरज नसलेल्या वस्तू खरेदी केल्या जातील. मानसिक गोंधळ टाळावा. प्रलोभनाला भुलून जाऊ नका. स्त्री सौख्याचा लाभ होईल. प्रवासाचा योग येईल. अकारण मनात धागधूग राहील. काही कारणाने गैरसमज होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. हातून दानधर्म पूजापाठ घडतील. त्यासाठी वेळ आणि पैसा खर्च केला जाईल. व्यवसायात विक्री चांगली राहील. काही सहकारी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील.

मीन (Pisces) : बर्‍याच गोष्टी सामोपचाराने हाताळाव्यात. वडीलधार्‍याच्या तब्येतीची काळजी घ्यावी. काळजी वाटत राहील. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. कौटुंबिक जिव्हाळा जतन करावा. थोरांचे विचार जाणून घ्यावेत. विविध प्रकारचे लाभ होतील. मात्र देण्या-घेण्याचे व्यवहार जपून करा. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. भावंडांच्या सहवासात याल. चांगले बोलणे होईल. नोकरीत थोड्या अडचणी येतील.

Advertisement