SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सावधान! आपल्या फोनमध्ये असतील ‘हे’ 17 अ‍ॅप तर लगेच करा डिलीट

मुंबई :

गुगल प्ले स्टोअरवर हजारो अ‍ॅप्स  आहेत. युजर्स त्यांच्या गरजेनुसार ही अ‍ॅप्स  डाऊनलोड करून त्याचा वापर करतात. मात्र प्ले स्टोअरमध्ये असेही काही अ‍ॅप्स  आहेत जो तुम्हाला मोठा फटका देऊ शकतात. जर तुम्ही वेळेवर या अ‍ॅप्सकडे लक्ष दिलं नाहीत तर तुमच्या वैयक्तिक डिलेट्ल देखील धोक्यात येऊ शकतात. अशाच काही व्हायरस आणि अॅप्स संदर्भातील माहिती समोर आली आहे.

Advertisement

हे अॅप्स आपल्या बँक डीटेल्सला धोका पोहोचवत असून यात आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. कष्टाने कमावलेला पैसा एखाद्या अॅपमुळे एका क्षणात नाहीसा होऊ शकतो, त्यामुळे ही बातमी लक्षपूर्वक वाचणे गरजेचे आहे. महत्वाची बाब म्हणजे या अॅप्सला Google Play ने देखील त्यांना स्टोअरमधून काढून टाकले आहे. गुगल नियमितपणे अशा धोकादायक अॅप्सला प्लेस्टोरवरून बाहेरचा रस्ता दाखवत असते.

ही आहे यादी :-

Advertisement
  • Document Manager : हे अॅप तुमची कागदपत्रे व्यवस्थित ठेवण्यासाठी आहे, उलट ते तुमचे दस्तऐवज लीक देखील करू शकतात.
  • Coin Track Loan – Online Loan : हे अॅप तुम्ही कर्ज घेण्यास पात्र आहात की नाही हे सांगते
  • Cool Caller Screen : हे अॅप वापरकर्त्याला कॉलर स्क्रीन बदलण्याची परवानगी देते, त्या बदल्यात ते तुमचे नुकसान देखील करू शकते.
  • PSD ऑथ प्रोटेक्टर: हे एक गेमिंग अॅप आहे, ते देखील त्वरित हटवणे आवश्यक आहे.
  • RGB इमोजी कीबोर्ड : लोक हे अॅप इमोजीसाठी डाऊनलोड करतात जे धोक्याचे लक्षण आहे.
  • Camera Translator Pro : या अॅपचा दावा आहे की कॅमेरासह जे काही स्कॅन केले जाईल ते संबंधित भाषेत भाषांतरित केले जाईल.
  • Fast PDF Scanner : हे अॅप पीडीएफ जलद स्कॅन करण्याचा दावा करते.
  • Air Ballon Wallpaper: हे एक अॅप आहे जे तुम्हाला वॉलपेपर बदलण्याची परवानगी देते.
  • Colorfur Messanger: अॅपने रंगीत संदेश पाठवण्याची सुविधा देण्याचा दावा केला आहे.

 

  • Thug Photo Editor: लोक फोटो संपादित करण्यासाठी या अॅपचा वापर करतात.
  • Anime Wallpaper: हे अॅप वॉलपेपर बदलण्यासाठी देखील वापरले जाते.
  • Peace SMS : अॅप शांती संदेश सुचवण्यासाठी कार्य करते, जेणेकरून ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले जाऊ शकतात.
  • Happy Photo Collage : फोटो कोलाजसाठी लोक हे अॅप डाउनलोड करतात.
  • Pellet Messages : Pellet Messages साठी अॅप डाऊनलोड.
  • Smart Keyboard : कीबोर्ड स्मार्ट करण्यासाठी लोक अनवधानाने हे अॅप डाऊनलोड करतात.
  • 4K Wallpapers : हे अॅप वॉलपेपर बदलण्यासाठी देखील वापरले जाते.
  • Original Messangers : हे देखील एक मेसेंजर अॅप आहे. ज्याद्वारे तुमची फसवणूक केली जाऊ शकते.

Advertisement