दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. अहमदनगर येथील मिलिटरी हॉस्पिटल येथे विविध पदांसाठी भरती होत आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (Military Hospital Ahmednagar Recruitment 2022). इच्छुक व पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
कोणत्या पदांसाठी भरती होत आहे, त्यासाठी नेमकी पात्रता काय, अर्ज कुठे व कधीपर्यंत करावा लागेल.. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
एकूण जागा : 67
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
स्वयंपाकी (Cook) (10 जागा)
- उमेदवारांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेलं असावं
- मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असावा.
- उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी-शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक
- वयोमर्यादा – 18 ते 25
वार्ड सहायिका (Ward Assistant) (57 जागा)
- दहावीपर्यंत शिक्षण
- मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण
- संबंधित पदाचा किमान अनुभव
- पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक.
- वयोमर्यादा – 18 ते 25
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 ऑगस्ट 2022
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : पीठासीन अधिकारी (BOO-III), मुख्यालय दक्षिणी कमांड, c/o मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर.
मूळ जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1P0qRGfPkftdsaOIJvqdzFQSgJ45EWJNr/view