SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘अग्निवीरां’ना उद्योजकांकडून ‘जाॅब ऑफर्स’, आणखी एक उद्योग समूह देणार नोकऱ्या..!

‘अग्निपथ’ योजनेविरोधात (Agnipath Scheme) देशभर आंदोलने सुरु झाल्यानंतर केंद्र सरकारने ‘अग्निवीरां’साठी अनेक सवलती जाहीर केल्या. त्यानंतर आता या योजनेला पाठिंबा देण्यासाठी देशातील मोठमोठे उद्योग समूह पुढे येत आहेत. ‘अग्निपथ’ला केवळ समर्थनच नव्हे, तर अग्निवीरांना त्यांच्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या ऑफर्सचा देत आहेत.

सुरुवातीला ‘महिंद्रा ग्रुप’चे (Mahindra Group) सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी या कुशल मनुष्यबळाचा त्यांच्या कंपन्यांना फायदा व्हावा, यासाठी ‘अग्निपथ’ योजना अंमलात येण्यापूर्वीच त्यांच्या उद्योग समूहात अग्निवीरांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिलं.. त्यानंतर देशातील इतरही उद्योग समूहांनीही या योजनेला पाठिंबा दिला आहे..

Advertisement

‘महिंद्रा ग्रुप’नंतर देशातील महत्वाचा उद्योग समूह असणाऱ्या ‘टाटा सन्स’ कंपनीसह (Tata Sons) इतर बड्या उद्योग समुहांनी ‘अग्निवीरां’ना त्यांच्या समुहात नोकरी देण्याची घोषणा केलीय. तसेच, या उद्योजकांनी ‘अग्निपथ’ योजनेचे तोंड भरून कौतुकही केलंय. त्यामुळे केंद्र सरकारलाही दिलासा मिळाला आहे..

Advertisement

‘अग्निपथ’ योजनेवरुन देशात सुरु असलेल्या हिंसेमुळे ‘आनंद महिंद्रा’ यांनी ट्विटरवरुन आपण दुःखी झाल्याचे म्हटले होते. या योजनेमुळे तरुणांना स्वंयशिस्त लागेल, त्यांच्यात क्षमता निर्माण होईल. तसेच त्यांच्याकडे 4 वर्षांच्या प्रशिक्षणानंतर कौशल्यही असेल.. त्यामुळे या गोष्टी त्यांना रोजगार प्राप्तीसाठी महत्वाच्या ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

‘टाटा सन्स’मध्ये नोकरी मिळणार

Advertisement

महिंद्रा यांच्यानंतर ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी ‘अग्निवीरां’ना त्यांच्या समुहात नोकरीचं आश्वासन दिलंय. तसेच, त्यांनी ‘अग्निपथ’ योजनेलाही पाठिंबा दिला. ‘अग्निपथ’ योजना देशाच्या संरक्षण दलात सेवा बजावण्याची उत्तम संधी असून, अशा तरुणांचे ‘टाटा’ समुहात स्वागत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, ‘अग्निपथ’ योजनेवरुन देशात आंदोलने सुरु असताना, तिन्ही सैन्य दलांनी भरतीची प्रक्रिया सुरु केलीय. त्यानुसार, आर्मीसाठी 1 जुलैपासून, वायुसेनेसाठी 24 जूनपासून, तर नौदलासाठी 25 जूनपासून भरती प्रक्रिया सुरु होत असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement