SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ बँका देताय स्वस्त कर्ज, होम लोन घ्यायचंय तर मग वाचा व्याजदर..

प्रत्येक माणसाला वाटतं की आपलं स्वतःच्या हक्काचं असं एक घर असावं, ज्याला आपलं म्हणता येईल. बजेट असलं की चिंता नसते ती पैसे कुठून उभे करायचे. पण ज्यांच्याकडे पैसे कमी असतात, ते देखील रिस्क घेऊन 10 ते 20 वर्षांसाठी घेतलेले लोनचे हप्ते फेडत असतात. जर तुम्हालाही वाटत असेल की आपण जवजवळ लाखो रुपयांचे लोन फेडू शकतो, तर कर्ज घेण्यास काही हरकत नसते. फक्त व्याजदर किती आहे हे तपासणे महत्वाचे असते, कोणती बँक किती टक्के व्याजदराने तुम्हालादेणार आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.

म्हणून आज आपण अशा काही बँकांचे व्याजदर माहीत करून घेणार आहोत ज्या ग्राहकांना कमीत कमी व्याजदराने घरासाठी कर्ज (Home Loan) देऊ शकतात. भारतातील मोठ्या बँका दर 30 लाखांच्या रकमेवर 20 वर्षांसाठी कर्ज देत असतात.

Advertisement

▪️ बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra): ही बँक तुम्हाला 6.40-9.55 टक्के व्याजदराने कर्ज देते. त्या व्याजदरानुसार, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 22,191-28,062 रुपयांपर्यंतचा EMI भरावा लागेल. बँक कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के किंवा जास्तीत जास्त 25,000 रुपये प्रक्रिया शुल्क आकारते.

▪️ स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India): व्याज दर 6.70 ते 6.90 टक्के आहे. यानुसार EMI 22,722 ते 23,079 असेल. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.35 किंवा कमाल 10,000 असेल.

Advertisement

▪️ एचडीएफसी (HDFC Bank): व्याज दर 6.70-7.65 टक्के आहे. यानुसार EMI 22,722 ते 24,444 रुपयांमध्ये असेल. तर प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के किंवा 3000 रुपये यापैकी जे जास्त असेल ते अधिक कर.

▪️ इंडियन बँक (Indian Bank): बँकेचा व्याज दर 6.50-7.50 टक्के आहे, त्यानुसार EMI 22,367 ते 24,168 रुपये यामध्ये असेल. प्रक्रिया शुल्क – कर्जाच्या रकमेच्या 0.20 ते 0.40 टक्के किंवा किमान 5,000 रुपये असेल.

Advertisement

▪️ आयसीआयसीआय बँक (ICICI Bank): व्याज दर 6.70-7.55 टक्के आहे. तर तुम्हाला ईएमआय 22,722 ते 24,260 रुपये असू शकतो. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.50-2.00 टक्के असेल.

▪️ बँक ऑफ इंडिया (Bank Of India): बँकेचा व्याज दर 6.50-8.85 टक्के आहे. यानुसार EMI 22,367 ते 26,703 रुपये असू शकतो. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के असेल.

Advertisement

▪️ बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda): बँकेचा व्याज दर 6.50 ते 8.10 टक्के असून त्यानुसार ईएमआय 22,367 ते 25,280 रुपये असू शकतो. तर प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के किंवा कमीत कमी 8,500 आणि जास्तीत जास्त 25,000 अधिक जीएसटी असेल.

▪️ आयडीएफसी बँक (IDFC Bank): आयडीएफसी बँकेचा व्याजदर 6.50 ते 8.90 टक्के असून त्यानुसार ईएमआय 22,367 ते 26,799 रुपये तर प्रक्रिया शुल्क 10,000 रुपयांपर्यंत असू शकते.

Advertisement

▪️ कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank): व्याज दर 6.55 ते 7.20 टक्के आहे. त्यानुसार EMI 22,456 ते 23,620 रुपये असू शकतो. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेपैकी 2 टक्के तसेच GST आणि इतर कर असू शकतात.

▪️ युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India): युनियन बँक ऑफ इंडिया बँकेचा व्याज दर 6.60-7.35 टक्के असून EMI 22,544 ते 23,890 रुपयांपर्यंत असेल. याशिवाय प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.50 किंवा जास्तीत जास्त 15,000 अधिक GST शकतो.

Advertisement

▪️ पंजाब आणि सिंध बँक (Punjab And Sindh Bank): पंजाब आणि सिंध बँकेचा व्याज दर 6.50-7.60 टक्के आहे. यानुसार EMI 22,367 ते 24,352 रुपये असा असू शकतो. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.15 ते 0.25 टक्के आणि GST असेल.

▪️ पंजाब नॅशनल बँक (PNB): या बँकेचा व्याज दर 6.75-8.80 टक्के असून, EMI 22,811 ते 26,607 रुपये असू शकतो. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.35 टक्के किंवा कमाल 15,000 रुपये असेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement