SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय तटरक्षक दलाने (ICG) गट सी विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येते आहे.

विभागाचे नाव : भारतीय तटरक्षक दल (ICG)

एकूण पदसंख्या व पदाचे नाव :
मोटार ट्रान्सपोर्ट फिटर – 5 पदे
स्प्रे पेंटर : 1 पद
मोटर ट्रान्सपोर्ट मेकॅनिक : 1 पद

शैक्षणिक पात्रता :
भारतीय तटरक्षक दलात गट क पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, संबंधित क्षेत्रातील कामाचा दोन वर्षांचा अनुभव असावा.

मासिक वेतन : गट सी पदांवर निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल 2 अंतर्गत दरमहा 19,900 रुपये पगार दिला जाईल.

वयोमर्यादा : किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 27 वर्षे

कशी असेल निवड प्रक्रिया?
भारतीय तटरक्षक दलातील या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी, कौशल्य चाचणी आणि शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल. ही लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेत किमान 50 टक्के गुण मिळणं आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार ICG गट C भरती 2022 साठी 9 जुलै 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट : https://joinindiancoastguard.cdac.in/

Advertisement