SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

योगासने करताना या नियमाचे करा पालन; तुमचे आरोग्य होईल निरोगी

मानवाच्या उत्तम आरोग्य हवं असण्यासाठी योगा करणे हा सर्व आजारांवरचा उपाय आहे असे समजले जाते. मग तो कसा हि असो तो शारीरिक असो वा मानसिक, दररोज योगा करणे कधीहि फायदेशीर असतो, कारण त्याने माणूस शारीरिक आणि मानसिक दृष्टया सुदृढ राहतो..

मोठ्या मोठ्या आजारांना दूर करण्यासाठी योगा करणे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. प्रत्येक शारीरिक व्यायाम करताना काही नियम व पद्धती असतात त्याप्रमाणे योगा करताना काही महत्वाचे नियम असतात, ज्यांना पाळून योगाभ्यास केल्याचा आरोग्यास देखील फायदा होतो.

Advertisement

योगासने करताना कोणते नियम पाळावे? :

■ योगा करताना एखाद्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास सुरु करा.

Advertisement

■ योगाभ्यास करण्याची योग्य वेळ सकाळचा – सूर्योदय किंवा सायंकाळचा मंद सूर्यास्त

■ योगा करण्याच्या पूर्ण नियोजन करा व त्यापूर्वी आंघोळ करा.

Advertisement

■ योगा हा नेहमी रिकाम्या पोटी करावा आणि योगा करण्यापूर्वी देखील काहीच खाऊ नये.

■ योगा करताना आरामदायक, सैल सुती कापडे घाला.

Advertisement

■ योगा करण्यापूर्वी सर्व नकारात्मक किंवा वाईट विचारांना मनातून पहिले काढून टाका.

■ एखाद्या शांततेच्या ठिकाणी आणि स्वच्छ जागेवर योगा करा.

Advertisement

■ योगा करण्यापूर्वी आपले संपूर्ण लक्ष योगाभ्यासावर देणे आवश्यक.

■ योगा हा नेहमी संयम आणि चिकाटीने करा मानस शांती भेटेल.

Advertisement

■ योगा करताना आपल्या शरीरावर बळजबरी किंवा जबरदस्तीने जाड वस्तूचा ताण होईल असं काही करू नका.

■ नेहेमी धैर्य ठेवा! योगाचे फायदे मिळण्यास नेहमी वेळ लागतो. परंतु त्याचे फायदे अनेक असतात.

Advertisement

■ योगा केल्यावर अर्धा तास काहीच खाऊ नका. तर तासाभराने अंघोळ करा. प्राणायाम हे नेहमी आसन केल्यावर करा.

■ कोणतीही शारीरिक त्रास असल्यास योगा करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Advertisement

■ योगा करताना काही त्रास वाढू लागत असल्यास किंवा नवीन समस्या उद्भवल्यास योगा थांबवून विश्रांती घ्या.

■ योगा अभ्यासकरताना नेहमी खाण्या-पिण्यात संयम बाळगा.

Advertisement

■ गरोदरपणात एखाद्या योगगुरूच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करणे उत्तम होईल.

Advertisement