SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात लवकरच धावणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस

मुंबई :

मुंबईत लवकरच डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसची सुरुवात होण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 7 ऑगस्ट रोजी बेस्टचा स्थापना दिवस आहे. बेस्ट स्थापना दिनाचे औचित्य साधून मुंबईतील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस लाँच करण्यात येणार आहे.

Advertisement

एका अहवालानुसार मुंबईतील डबल डेकर बसची संख्या 2019 मध्ये 120 इतकी होती. तर 2021 मध्ये ही संख्या केवळ 48 वर आली होती. डबल डेकर बसेसची कमी होणारी संख्या लक्षात घेऊन शहरातील सर्वात जुने वाहतूक माध्यम सुरक्षित ठेवण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.

बेस्टच्या इंधनावर धावणाऱ्या बसेस आता पूर्णतः इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याची तयारी सुरू आहे. राज्य सरकार 900 इलेक्ट्रिक बस खरेदी करणार आहे. 2028 पर्यंत मुंबई शहरात धावणाऱ्या सर्व डिझेल बसेस इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याची सरकारची योजना आहे. राज्य सरकारचं म्हणणं आहे की बेस्टच्या सर्व बस एकतर पूर्णपणे इलेक्ट्रिकवर धावतील किंवा त्या हायड्रोजन युक्त इंधनावर चालवल्या जातील.

Advertisement

कोणत्या इंधनाचा वापर करून बसेस चालवणे अधिक सुरक्षित आणि कमी खर्चिक असेल हे ठरवले जाणार आहे. मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या बेस्टच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. सध्या मुंबई शहरात दररोज 31 लाख प्रवासी बसने प्रवास करतात.

येत्या एक ते दोन वर्षांमध्ये प्रवाशांच्या तुलनेत 2,3 लाखांची वाढ होऊ शकतो. सरकारने यापूर्वीच 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसना मान्यता दिली आहे. यामधील 225 बसेस या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये रस्त्यावर दिसू शकतात.

Advertisement