SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सीएनजी की पेट्रोल कार? कोणती जास्त फायदेशीर, वाचा फायदेच फायदे..

बाईक, कार चालवायची म्हटलं की, पेट्रोल डिझेल टाकणं आलंच. जर एखाद्या व्यक्तीला कार घ्यायची असली तर सर्वात आधी ती व्यक्ती बाजारात कार घेण्यासाठी जाते. मग बजेटनुसार कार खरेदी करताना त्याच्याकडे पेट्रोल कार, डिझेल कार, हायब्रीड कार, सीएनजी कार (CNG Car) आणि इलेक्ट्रिक कार घेण्याचे ऑप्शन असतात.

देशात आधीपासूनच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी कार या बाजारात आल्यापासून लोकांच्या आवडीच्या बनल्या आहेत. या कार पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या असतात. पण त्यामध्येही पुढे जाऊन आता सीएनजी इंधनावर चालणाऱ्या कार बाजारात येत आहे. यासोबतच आता हायब्रीड आणि इलेक्ट्रिक कारही लोक वापरत आहेत.

Advertisement

सध्या इलेक्ट्रिक कार बाजारात यायला फक्त सुरुवात झाली आहे. येत्या काही वर्षांत त्या अधिक सुरक्षित असल्याची खात्री झाल्यास त्या घेणे योग्य राहतील. पण रेंज चा विचार केला तर सीएनजी परवडेल, याशिवाय चार्जिंग ची समस्या देखील सुटते. यामुळे सध्या सीएनजी पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे सीएनजी कार लोक वापरण्याकडे जास्त लक्ष देत आहे. शिवाय महत्वाचं म्हणजे पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा सीएनजीवर चालणारी वाहने कमी प्रदूषण करतात.

काही महिन्यांपासून पेट्रोलपेक्षा सीएनजीच्या किंमतीत कमी वाढ झाली आहे. पण असं असलं तरी या दोघांपैकी पर्याय निवडायचं झालं तर तुम्हीही म्हणाल की सीएनजी खिशाला परवडतोय. यामुळे पेट्रोल कारपेक्षा सीएनजी कार घ्यायची इच्छा आजकाल लोकांची जास्तच असते.यापूर्वी पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीचे दर खूपच कमी होते, मात्र यंदाच्या वर्षी ते वाढले आहेत. तरीही लोकांना सीएनजी कार घेणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Advertisement

देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोल प्रति लिटर 100 रुपयांपेक्षा जास्त असून सीएनजीची किंमत 70-74 रुपयांच्या जवळपास आहे. याशिवाय सीएनजी कार जास्त मायलेज देतात. उदाहरण देऊन सांगायचं झालं तर जर पेट्रोल कार 1 लिटर पेट्रोलमध्ये 15 किमी चालते आणि तीच कार सीएनजी कार असेल, तर सीएनजी व्हेरियंटसह कारचे मायलेज 20-22 किमी असण्याची शक्यता आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement