SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अवघ्या 5 हजार रुपयांमध्ये मिळताहेत हे’ ब्रँडेड 5G स्मार्टफोन्स

दिल्ली :

लोकप्रिय शपिंग प्लॅटफॉर्म Amazonवर आता एक ऑफर सुरु असून ज्यामध्ये मोबाईल फोन्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. Amazon Monsoon Carnival सेल हा Amazonवर काही दिवसांसाठी सुरु असणार आहे. यामध्ये 5G स्मार्टफोनवर चांगला डिस्काउंट मिळत आहे. जे मोबाईल खरेदी करण्यासाठी सध्या ऑफर् शोधत आहे, अशा व्यक्तींसाठी एक चांगली संधी यानिमित्ताने आहे. ज्या मोबाईलवर ऑफर देण्यात येणार आहे, त्यामध्ये Oppo A74 5G, iQOO Z6 5G, Redmi Note 10T 5G या मोबाईल फोनचा समावेश आहे.

Advertisement

OnePlus Nord CE 2 Lite 5G फोनवर एक्सचेंज ऑफरसह 12,050 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. हा डिस्काउंट मिळाल्यानंतर अवघ्या 7,499 रुपयांमध्ये हा फोन मिळणार आहे. Redmin Note 10T 5G फोनवर एक्सचेंज ऑफरसह 9,200 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. ऑफरचा फायदा मिळाल्यानंतर अवघ्या 2,799 रुपयांमध्ये मिळणार आहे. Samsung Galaxy M33 5G फोनवर एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास 10,050 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. या ऑफरचा फायदा मिळाल्यानंतर 7,449 रुपयांमध्ये हा फोन मिळणार आहे.

 

Advertisement

iQoo Z6 5G या फोनवर देखील चांगला डिस्काउंट मिळणार आहे. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास iQoo Z6 5G या फोनवर 9,200 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. 14,999 रुपयांना मिळणारा हा फोन ऑफर मिळाल्यानंतर अवघ्या 5,799 रुपयांमध्ये मिळणार आहे. Oppo A74 5Gफोनवर एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास 9,200 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. त्यानंतर हा फोन अवघ्या 5,790 रुपयांना मिळणार आहे. वरील पाचही फोन हे 5G आहेत. या सर्व फोनवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे.

Advertisement