SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): हौस मौज करण्यात खर्च वाढू शकतो. प्रत्येक गोष्टींचा उत्तम आस्वाद घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची इतरांवर चांगली छाप पडेल. सर्वांना लाघवीपणे आपलेसे कराल. आवडत्या कामात दिवस घालवाल. चांगला मित्र जोडणे हिताचे. प्रसंगी तज्ज्ञांचा सल्ला घेणे लाभाचे. योग्य अयोग्य समजून घेऊन मग निर्णय घेणे हिताचे. रागावर नियंत्रण ठेवा.

वृषभ (Taurus): पारदर्शीपणे वागणे ठेवा. झोपेची तक्रार जाणवेल. बाह्य गोष्टींचे आकर्षण वाढू शकते. मनातील निराशा दूर सारावी. फसवणुकीपासून सावध रहा. डोकं शांत ठेवा आणि विचारपूर्वक कृती करा. प्रसंगाला धीराने सामोरे जा. भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि व्यावहारिक राहणे हिताचे. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो. नोकरदार लोकांसाठी दिवस सुखकर असेल.

Advertisement

मिथुन (Gemini) : मित्रांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करा. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाही. प्रयत्नांसाठी नियोजन आणि सातत्य महत्त्वाचे. अनुभवींचा सल्ला घेऊन नियोजन करणे हिताचे. नोकरीत कोणाच्या तरी सहकार्याने काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल.

कर्क (Cancer) : मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. खर्चाचा आकडा निश्चित करा. मित्रांशी मतभेद संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल. तुमचा सल्ला इतरांसाठी फायद्याचा ठरेल. व्यवहारज्ञानाचा उपयोग होईल. तब्येत जपा. घरच्यांना वेळ द्याल. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे. नातेवाईकांच्या भेटी होतील.

Advertisement

सिंह (Leo) : सासुरवाडीची मदत मिळेल. सांपत्तिक दर्जा सुधारला जाईल. अचानक धनलाभ होईल. कामातून अनपेक्षित लाभ होईल. पत्नीची नाराजी दूर करावी. विशेष प्रयत्न करणे लाभाचे. दिवस प्रगतीचा. उत्साह वाढेल. आत्मविश्वास वाढेल. पगारदार लोक त्यांच्या वरिष्ठांना कठोर परिश्रमाने संतुष्ट करू शकतात. व्यापाराच्या नवीन योजना आखल्या जातील. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

कन्या (Virgo) : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराबाबत आकर्षण वाढीस लागेल. कामासंबंधी नवीन योजना आखाव्यात. भागिदारीतून चांगला लाभ होईल. कौटुंबिक सुख-शांती जपावी. आनंदात दिवस जाईल. मनाजोगत्या घटना घडतील. प्रगतीचा योग आहे. वास्तवाचे भान राखणे आणि व्यवहारज्ञानाने वागणे हिताचे. नवीन संबंध प्रस्थापित केले जातील. जवळचे मित्र मंडळी भेटतील.

Advertisement

तुळ (Libra) : कामानिमित्त प्रवास करावा लागेल. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. हितशत्रूंचा विरोध मावळेल. हातातील कामात यश येईल. खरेदीचा योग आहे. खर्च वाढेल. गरज ओळखून निर्णय घेणे हिताचे. दिवस मजेत जाईल. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.

वृश्‍चिक (Scorpio) : मानसिक गोंधळाला बळी पडू नका. कौटुंबिक गोष्टीतून मार्ग काढता येईल. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. परोपकाराची जाणीव ठेवाल. आत्मनिर्भर व्हा. निर्णय विचारपूर्वक आणि स्वतःच्या हिंमतीने घेऊन मग ते अंमलात आणा. अनुभवींचा सल्ला घेणे हिताचे. मनामध्ये आनंद राहील. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.

Advertisement

धनु (Sagittarius) : शांत व संयमी विचारांची आवश्यकता. व्यवहारी भूमिका ठेवून वागाल. सर्वांशी सर्जनशीलतेने वागण्याचा प्रयत्न कराल. छंद जोपासण्यात वेळ घालवाल. मित्र परिवारात लाडके व्हाल. चिंतामुक्त व्हाल. दिवस मजेत जाईल. स्वतःच्या मर्जीचे मालक असाल. स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी वेळ काढाल. विचारपूर्वक वागणे हिताचे. सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति.

मकर (Capricorn) : सर्वांना मनापासून मदत कराल. जवळचे मित्र जमवाल. दिवस गप्पा-गोष्टीत व मजेत घालवाल. कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. अतिरेक घातक असतो हे लक्षात ठेवा. आत्मविश्वास हवा पण अतिआत्मविश्वास नको. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो. नोकरदार लोकांसाठी दिवस सुखकर असेल.

Advertisement

कुंभ (Aquarious) : अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नवीन संबंध प्रस्थापित केले जातील. जवळचे मित्र मंडळी भेटतील. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. प्रतिष्ठा वाढेल. इतरांवर प्रभाव टाकाल. निर्णय घेऊन कामं वेगाने पूर्ण कराल. प्रगती होईल. नवीन संबंध बनतील. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.

मीन (Pisces) : तुमच्यातील अंगीभूत कलागुणांना वाव द्यावा. आळस झटकून कामाला लागावे. ऐषोरामाच्या वस्तूंकडे ओढ वाढेल. भावंडांशी मतभेद संभवतात. कामातून आनंद व समाधान शोधावा. थांबणे आणि विसंबून राहणे टाळा. आत्मनिर्भर व्हा. प्रगतीचा योग आहे. वास्तवाचे भान राखणे हिताचे. नवीन संबंध बनतील. व्यापार व्यवसाय मध्यम राहील. सत्संग होईल.

Advertisement