SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 42 हजार पदांसाठी होणार भरती..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. येत्या डिसेंबर-2022 पूर्वी विविध सरकारी विभागांत तब्बल 42 हजार जागांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. कर्मचारी निवड आयोग, अर्थात ‘स्टाफ सिलेक्शन’ (SSC) मार्फत ही भरती होणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कर्मचारी निवड आयोग लवकरच 15 हजार 247 पदांसाठी नियुक्तीपत्र जारी करणार आहे. ही प्रक्रिया पुढील दोन ते तीन महिन्यांत होणार आहे. ‘अग्निपथ’ (Agneepath Scheme) योजनेवरून देशात गदारोळ सुरु असताना, स्टाफ सिलेक्शनमार्फत डिसेंबरपूर्वी होणाऱ्या 42 हजार पदभरतीच्या बातमीने दिलासा मिळाला आहे.

Advertisement

Advertisement

सरकारी विभागात भरती सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या दीड वर्षात देशातील 10 लाख तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून विविध सरकारी विभागांकडून भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे.

Advertisement

Advertisement

दरम्यान, ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ (पीआयबी) यांच्याकडून ट्विट करण्यात आलं आहे. त्यात असं म्हटलं आहे, की कर्मचारी निवड आयोगाने आगामी परीक्षांच्या आधारे 67,768 रिक्त जागा त्वरित भरण्याची योजना तयार केली आहे. त्यात डिसेंबर-2022 पूर्वी 42,000 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे..

कर्मचारी निवड आयोगाकडून (SSC) विविध सरकारी विभागात आगामी दोन-तीन महिन्यांत 15,247 रिक्त पदांसाठी नियुक्ती पत्र जारी करण्यात येणार आहे. बेरोजगार तरुणांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सरकारी नोकऱ्या उपलब्ध झाल्याने इच्छुकांचे मनोबल उंचावणार आहे.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement