SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पुढील 5 दिवस स्वस्तात सोने खरेदीची संधी, लगेच घ्या ‘या’ योजनेचा लाभ…!

सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.. केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणारी  ‘सॉवरेन गोल्ड बाँड’च्या सीरिज आजपासून (ता. 20) पुन्हा एकदा जारी करण्यात आली आहे. सोन्यात गुंतवणूक व पारदर्शकता वाढविण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी ही सीरिज जारी करीत असते.

स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आली आहे. ‘सॉव्हरेन गोल्ड बाँड’मध्ये (Sovereign Gold Bond) आजपासून गुंतवणूक करता येणार आहे. ही सीरिज 24 जूनपर्यंत (शुक्रवार) खुली राहणार आहे. त्यात किमान किती गुंतवणूक असेल, गुंतवणुकीसाठी सोन्याचा दर काय, किती परतावा मिळेल, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

किती गुंतवणूक असेल..?

‘सॉव्हरेन गोल्ड बाँड’मध्ये किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी एक ग्रॅम सोन्याची किंमत 5,041 रुपये निश्चित करण्यात आली आहे. डिजिटल पद्धतीने पेमेंट केल्यास प्रति ग्रॅममागे 50 रुपयांची सूट मिळेल.. मार्चमध्ये आलेल्या सीरिजमध्ये सोन्याचा भाव 5,059 रुपये होता. मात्र, त्या तुलनेत यावेळी 18 रुपये प्रति ग्रॅम भाव कमी आहे.

Advertisement

किती परतावा मिळेल..?

सोन्याच्या परताव्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, गेल्या एका वर्षात रुपयात 7.37 टक्के आहे, तर डॉलरमध्ये 4.17 टक्के परतावा मिळाला आहे. परतावा कमी मिळत असला, तरी या सीरिजमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. कारण, गुंतवणुकीचा हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो.. ‘सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड’मध्ये दरवर्षी 2.5 टक्के व्याज मिळते. शिवाय, सोन्याच्या वाढत्या किमतीचा फायदाही यात मिळतो.

Advertisement

अशी करा गुंतवणूक..?

बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SHCIL), क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCIL), पोस्ट ऑफिस, एनएसई (NSE), बीएसई (BSE) मार्फत सोने रोखे खरेदी करू शकता. एजंटच्या माध्यमातूनही यात गुंतवणूक करता येते. ‘सॉव्हरेन गोल्ड बाँड’चा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षांचा आहे. तुम्ही पाच वर्षांनीही पैसे काढू शकता. तुम्हाला एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलोपर्यंत सोनेखरेदी करता येते.

Advertisement

2022-23 या आर्थिक वर्षातील हा पहिला इश्यू आहे. त्याचा दुसरा भाग ऑगस्टमध्ये येणार आहे. त्यामुळे घाई करण्याची गरज नाही. तुम्ही आता थोडी गुंतवणूक करुन ऑगस्टमध्ये पुन्हा चांगली गुंतवणूक करू शकता.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement