SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

10वी पास उमेदवारांना ‘या’ विभागात मिळणार थेट जॉब; लेखी परीक्षा नाही

मुंबई :

गेल्या काही दिवसांपासून भारतात महागाई वाढली आहे. महागाई सोबतच बेरोजगारी सारखे प्रश्न उपस्थित झाले आहेत. बेरोजगारी आहे असं आपण म्हणतो, मात्र केंद्र आणि राज्य सरकारची विविध पदांची भरती ही सातत्याने सुरु आहे. टपाल जीवन विमा पोस्टल लाईफ इन्शुरन्स (Postal Life Insurance Thane PLI Thane) ठाणे विभागात लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे.

Advertisement

यासाठीची अधिसूचना संबंधित विभागाकडून अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. अभिकर्ता.या पदांसाठी ही भरती असून, इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

मुलाखतीची तारीख 04 जुलै ते 05 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी उमेदवाराने इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं अशी अट आहे.

Advertisement

उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं अनिवार्य आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 वर्ष ते 50 वर्ष च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो अशी कागदपत्र आवश्यक आहेत.

या भरती संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
https://pli.indiapost.gov.in/CustomerPortal/Home.action या लिंकवर क्लिक करावे. आपल्याला भरती संदर्भात सर्व माहिती यामध्ये मिळून जाईल.अर्ज करण्यासाठी वरिष्ठ अधीक्षक डाकघर ठाणे मंडल यांचे कार्यालय , दुसरा मजला, ठाणे(प) रेल्वे स्टेशनजवळ, ठाणे- 400601 हा पत्ता असणार आहे.

Advertisement