SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फोरव्हीलर घेणाऱ्यांसाठी खुशखबर; Mahindra च्या ‘या’ 5 गाड्यांवर आकर्षक डिस्काउंट

मुंबई : 

मजबूती आणि आकर्षक गाड्या असणाऱ्या महिंद्रा कंपनीने आता आपल्या काही गाड्यांवर बंपर डिस्काउंट देण्यास सुरुवात केली आहे. जर आपणही गाडी घेण्याच्या प्रतीक्षेत असाल तर आपण खाली सांगितलेले काही पर्याय नक्कीच निवडू शकतात. महिंद्रा स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio), महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero), महिंद्रा मराझो (Mahindra Marazzo), महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV300) ते महिंद्रा अल्तुरास जी या 4 गाड्यांच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे. महिंद्रा स्कॉर्पिओची शोरूम किंमत 13 लाख 30 हजार रुपये इतकी आहे तर टॉप व्हेरियंट 18 लाख 19 हजार रुपयांना मिळते. महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी खरेदीवर 34,000 रुपये इतका डिस्काउंट मिळणार आहे.

Advertisement

महिंद्रा एक्सयूव्ही 300 कारची एक्स शोरूम किंमत 8. 41लाख इतकी आहे तर या कारच्या टॉप व्हेरियंटची किंमत 12.38लाख इतकी आहे. या कारच्या खरेदीवर 45,900 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. महिंद्रा बोलेरो या कारची सुरुवातीची किंमत 9 लाख 20 हजार रुपये इतकी आहे तर टॉप व्हेरियंटची किंमत 10लाख 16 हजार रुपये इतकी आहे. या कारच्या खरेदीवर 19,000 रुपये इतका डिस्काउंट मिळणार आहे.

महिंद्रा मराझो या कारची सुरुवातीची किंमत 13 लाख 17 हजार रुपये इतकी आहे तर टॉप व्हेरियंटची किंमत 15 लाख 35 हजार रुपये इतकी आहे. या कारच्या खरेदीवर आपण 19,000 रुपये इतका डिस्काउंट मिळवू शकतात. या चारही गाड्या अत्यंत आकर्षक आणि मजबूत बनावटीच्या म्हणून लोकप्रिय आहे. ज्यांना ज्यांना सध्याच्या घडीला कार खरेदी करायची आहे अशा ग्राहकांना सध्या बंपर डिस्काउंट खरेदीच्या वेळी मिळणार आहे आणि पैशांची बचत यामुळे होणार आहे.

Advertisement