SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांचा होणार डबल फायदा, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. शेतकऱ्यांच्या उसाला साखर कारखान्यांकडून किमान किफायशीर मूल्य..अर्थात ‘एफआरपी’ (FRP) नुसार पैसे दिले जातात.. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामाला खऱ्या अर्थाने दाम मिळतात. त्यानंतर राज्य सरकार आता आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे..

साखर कारखान्यांप्रमाणे गूळ उत्पादन (Jaggery production) घेणाऱ्या गुऱ्हाळ मालकाकडूनही शेतकऱ्यांच्या उसाला ‘एफआरपी’ (FRP) प्रमाणे दर मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.. याबाबत अभ्यास करण्यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.

Advertisement

पुढील दोन महिन्यांत याबाबत अभ्यास करुन ही समिती आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर करणार आहे. हा निर्णय झाल्यास गुऱ्हाळ चालकांनाही ऊसउत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांप्रमाणे ‘एफआरपी’ मिळणार आहे.

गुळ उत्पादकाचा निर्णयाला विरोध

Advertisement

दरम्यान, गुऱ्हाळ चालकांकडून सरकारच्या या निर्णयाला विरोध केला जात आहे. गुऱ्हाळ चालकांना ‘एफआरपी’चे बंधन लागू केल्यास साखर कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या सवलती गुऱ्हाळांनाही द्याव्यात, बाजारात साखरेचे दर कमी-जास्त झाल्यास सरकारकडून कारखान्यांना अनुदान दिलं जातं.. तसंच आम्हालाही मिळावं, अशी मागणी केली जात आहे.

साखर कारखानदारांना जशी मदत केली जाते, तशी मदत गूळउत्पादकांना केली जात नाही. मात्र, हे सरकार आमच्यावर नियम लादण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही ‘एफआर’पी’प्रमाणे रक्कम देण्यास तयार आहोत, पण सरकारनं कारखानदाराप्रमाणं आम्हाला मदत करावी, असे मत गुळ उत्पादकांनी व्यक्त केलंय.

Advertisement

साखरेप्रमाणे शासनानं गुळालाही हमीभाव दिल्यास, आम्ही शेतकऱ्यांना हमीभाव देऊ.. अतिरिक्त उसाचा प्रश्न काही प्रमाणात गुऱ्हाळांमुळे सुटला आहे. सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. गुऱ्हाळ उत्पादकांना संपवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही काही गूळ उत्पादकांनी केला आहे…

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement