SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

4 लाख रुपयांच्या बजेटमध्ये आता तुम्ही खरेदी करू शकता ‘या’ जबरदस्त कार

तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट चार लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही प्रीमियम कार खरेदी करण्यास आर्थिकदृषट्या असमर्थ असल्यास तुमच्यासाठी या हॅचबॅक कार सर्वोत्तम पर्याय ठरवू शकता. कारण या गाड्या अगदी कमी किंमतीत विकत घेता येतात आणि त्यामध्ये प्रीमियम गाड्यांशी स्पर्धा करणारे जबरदस्त फीचर्सही मिळतात. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी भारतात उपलब्ध असलेल्या स्वस्त कारची यादी घेऊन आलो आहोत, या कार तुम्ही 4 लाखांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

Maruti Suzuki S-Presso :
Maruti Suzuki S-Presso या कारची किंमत 3.99 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होत असून या कारला 1.0-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. तर हि कार 67bhp/90Nm टार्क जनरेट करते. या कारमध्येCNG पर्यायाही उपलब्ध आहे आणि हि कार 31KM हून अधिकचे मायलेज देते. या कारमध्ये, सेंट्रल माउंटेड इंस्ट्रूमेंट क्लस्टर, मारुती स्मार्ट प्ले स्टूडिओसह टचस्क्रीन सिस्टिम, डुअल फ्रंट एअरबॅग, यूएसबी आणि 12-व्होल्ट स्विच, स्टियरिंग माउंटेड कंट्रोल सारखे फिचर्स आहेत.

Advertisement

Maruti Alto :
Maruti Alto ला भारतीय बाजारात दोन दशकांहून अधिक काळ झाला आहे. या कारची किंमत साधारणतः 3.39 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. मारुती सुझुकी अल्टो 0.8-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून जे 47bhp आणि 69Nm टॉर्क जनरेट करते. ही कार मारुती सुझुकी एस-प्रेससो सारखीच CNG पर्यायामध्ये उपलबध आहे. सीएनजीसह कारचे मायलेज 31KM पेक्षाही अधिक असून या कारमध्ये टू-टोन डॅशबोर्डसह 7-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेंसर, फ्रंट आणि रिअर बॉटल होल्डर, पॉवर विंडो, रिमोट किलेस एंट्री आणि फ्रंट डुअल एयरबॅग आहेत.

Datsun redi-GO :
Datsun redi-GO हॅचबॅकची किंमत हि 3.83 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. या कारमध्ये 0.8 लीटर आणि 1 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून जे 22 kmpl पर्यंत मायलेज देते. या कारमध्ये LED DRL, LED फ्रंट फॉग लॅम्प, डिजिटल टॅकोमीटर, नवे डुअल-टोन 14-इंच व्हील कवर, अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्लेसह 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम आदी फीचर्स आहेत.

Advertisement