SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्टॅम्प ड्युटीबाबत मोठा निर्णय, मिळणार ‘एवढी’ मोठी सवलत..

आपण सर्वांनीच ऐकलं असेल की, कोणी जेव्हा मालमत्तेचा व्यवहार करत असतात तेव्हा सरकार कर आकारते म्हणजेच, तेव्हा विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे मालमत्तेचा अधिकार बदलतो आणि मग हा कर दिला जातो. त्याला ‘मुद्रांक शुल्क’ किंवा स्टॅम्प ड्यूटी असं म्हटलं जातं.

भारतात मुद्रांक शुल्काचे दर बर्‍याचदा जास्त असल्याने खरेदीदार व विक्रेते मुद्रांक शुल्काची भरपाई करण्याचे चुकवतात. तर काही नागरीकांनी जर कमी मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरला तर तो कमी भरल्याने त्यावर सरकार दंड आकारून ती रक्कम वसुल करते. पण आता हा दंड वसूल करण्याची कार्यवाही सुरू असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण नोंदणी व मुद्रांक विभागाने महत्वाचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय.

Advertisement

शासनाने मुद्रांक शुल्क भरण्याच्या रकमेवर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये सवलत योजना लागू केलीय. त्या सवलतीनुसार, मुद्रांक शुल्क फरकाची रक्‍कम दि. 31 जुलै 2022 पर्यंत भरल्यास दंडावर 90 टक्‍के सवलत मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय. नागरिकांनी जर दि. 1 ऑगस्ट ते दि. 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत अशा फरकाची रक्‍कम भरली की, दंडावर 50 टक्‍के सवलत मिळू शकते, अशी माहीती आहे.

सवलतीचा लाभ कसा घ्याल..?

Advertisement

अनेक प्रकरण असे असतात, ज्यामध्ये मुद्रांक शुल्क कमी असते पण नागरिक ते न भरता दंडाची रक्‍कम खूप वाढवतात आणि नंतर नागरीक ती भरण्यास तयार होत नाही. तर काही वेळेस बांधकाम व्यावसायिकाचा दोष असूनदेखील त्याचा त्रास नागरिकांना होतो. ज्या प्रकरणात मुद्रांक शुल्क तूट व दंड रक्‍कम भरणा करणे प्रलंबित आहे. त्या सर्व प्रकरणात नागरिकांनी मुद्रांक व नोंदणी विभागाच्या कार्यालयात संपर्क करून या दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement