SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): नातेवाईकांशी सलोखा वाढेल. कलेची आवड जोपसाता येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. खाण्यापिण्याची आवड दर्शवाल. क्षमता ओळखून नियोजन करा. जबाबदारीने वागा. कतृत्व दाखविण्याची संधी मिळताच ती संधी साधा. आजचा दिवस कामाला प्राधान्य देण्याचा आहे. तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या प्रेमळपणानं तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल.

वृषभ (Taurus): आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका. स्त्री वर्गापासून सावध राहावे. क्षणिक मोहाला बळी पडाल. अनाठायी खर्च केला जाईल. मनातील इच्छेला महत्त्व द्याल. दरारा वाढेल. प्रभाव वाढेल. नेतृत्वाची संधी मिळेल. प्रगती होईल. तुमच्या प्रलंबित कायदेशीर प्रकरणांकडे लक्ष देण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. निघणारा तोडगा तुमच्यासाठी चांगला असेल आणि त्यामुळे तुमची प्रतिमा उंचावेल.

Advertisement

मिथुन (Gemini) : हौस पूर्ण करता येईल. मैत्रीचे संबंध जोडले जातील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. कलेचे आवड जोपासता येईल. मानसिक ताणतणाव दूर सारावा. समोरच्या व्यक्तीचे पूर्ण ऐकून घ्या आणि समजून घ्या नंतर बोला. संयम महत्त्वाचा. कायदा-नियम पाळणे आणि वाद टाळणे हिताचे. हुशारीने कामं करण्यावर भर द्या. काहीतरी नवीन शिकून तुम्ही स्वत:लाच आश्चर्याचा धक्का द्याल.

कर्क (Cancer) : कामातून मानाची जागा मिळवाल. उत्कृष्ट बोलण्याने इतरांचे मन जिंकून घ्याल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. कलाकारांचा नाव लौकिक वाढेल. वाद टाळा. माणसं जोडणे हिताचे. तब्येत जपा. कायदा-नियम पाळा. आज तुम्ही कोणतीही इच्छा व्यक्त करा आणि ती एरव्हीपेक्षा लवकर पूर्ण होऊ शकते. तुम्ही काही दीर्घकालीन योजनांचाही विचार करू शकता.

Advertisement

सिंह (Leo) : मित्र परिवारात वाढ होईल. दिवस कामात व गडबडीत जाईल. सर्वांना आनंदाने आपलेसे कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. व्यावसायिक लाभाने खुश व्हाल. बदल स्वीकारा. नवी कौशल्य आत्मसात करा. आत्मनिर्भर होण्यावर भर द्या. कामासाठी आणि प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अगदी प्रसन्न आहे. ओळखीतलं कुणी तरी तुम्हाला नवीन ऑफर देऊ शकेल. तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या.

कन्या (Virgo) : लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. आळस झटकून कामाला लागावे. रेस सट्टा सारख्या व्यवहारात सतर्क रहा. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. नातेवाईकांची मदत मिळेल. वेळेच्या व्यवस्थापनावर भर द्या. कामाचे प्राधान्य ओळखून नियोजन करणे फायद्याचे. वाद टाळणे हिताचे. तुमच्या रिलेशनशिपमधून अति अपेक्षा ठेवू नका. त्यामुळे तुम्हालाच त्रास होऊ शकतो. ते तुमच्या बाजूने नसेल, तर सध्या ते जाऊ दे. त्याकडे लक्ष देऊ नका.

Advertisement

तुळ (Libra) : मानसिक अस्वास्थ्याला बळी पडू नका. गायन कलेचे कौतुक केले जाईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. संयम आणि जिद्द महत्त्वाची. नियोजन करुन कामं करा. आर्थिक नियोजन करा. खर्च जपून करा. तसंच तुम्ही कदाचित मार्केटलाही भेट देऊ शकता. दिवसाच्या उत्तरार्धात तुमची ऊर्जा कामी येऊ शकते. बाहेर अति खाणं टाळू शकता. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.

वृश्‍चिक (Scorpio) : एकमेकांच्या मताचा आदर करावा. आपले मत शांतपणे मांडावे. सहकार्‍यांना सोबत घेऊन चालावे. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे. प्रवासात सावधानता बाळगावी. आदर्श व्यक्तींचे अनुकरण करावे. कायदा-नियम पाळा. वाद टाळा. मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी नियोजन आणि प्रामाणिक कष्टांना पर्याय नाही हे लक्षात ठेवा.

Advertisement

धनु (Sagittarius) : जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणांवरून वाद संभवतो. आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न कराल. भागीदारीच्या व्यवसायात सबुरीने वागावे. वारसाहक्काची कामे फायदेशीर ठरतील. अचानक धनलाभ संभवतो. आर्थिक नियोजन आणि दिवसभराच्या कामाचे नियोजन करा. वेळेचे नियोजन महत्त्वाचे. प्रगतीची महत्त्वाची संधी मिळेल. इतरांवर प्रभाव टाकाल.

मकर (Capricorn) : घरगुती सुख सोईंकडे लक्ष द्याल. कौटुंबिक कटुता टाळण्याचा प्रयत्न करा. घरातील टापटि‍पी बाबत आग्रही राहाल. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. क्षुल्लक गोष्टींवरून त्रागा करू नये. तब्येत जपा आणि बाहेरचे खाणे टाळा. ताजे सकस अन्न खा. कायदा-नियम पाळा. वाद टाळा. आजचा दिवस अगदी घाईगडबडीचा असू शकतो.

Advertisement

कुंभ (Aquarious) : कला जोपासायला वेळ काढता येईल. धार्मिक कामात मदत कराल. विशाल दृष्टिकोन ठेवून वागाल. कामातील अडथळे दूर होतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. तब्येत जपा. खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित ठेवा. तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे हिताचे. कायदा-नियम पाळा. तुमच्या खर्चाचं शहाणपणानं नियोजन करा. मिळकतीपेक्षा खर्च जास्त असू शकतो.

मीन (Pisces) : प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल. व्यवहारी भूमिका घ्यावी लागेल. तुमच्या छंदाचे कौतुक केले जाईल. गप्पा गोष्टी करण्यामध्ये गुंग व्हाल. सहवासातून नवीन संबंध दृढ होतील. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नियोजन करा. आर्थिक नियोजनावर भर द्या. खर्च जपून आणि विचारपूर्वक करा. थोडी डोकेदुखी किंवा अस्वस्थपणा येऊ शकतो. आजचा दिवस काम करण्याचा आणि मानसिकरीत्या सजग राहण्याचा, सतत कार्यरत राहण्याचा आहे.

Advertisement