SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

Tata ची ही सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित कार CNG सेगमेंटमध्ये होणार लॉन्च

मुंबई :

मागील काही वर्षांपासून भारतात पेट्रोल-डिझेल या इंधनावर चालणाऱ्या गाड्यांचा बाजारपेठेत बोलबाला होता. सध्या पेट्रोल-डिझेलचे भाव हे गगनाला भिडत असल्याने इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्यांची मागणी कमालीची वाढली आहे. यातच काही महिन्यांपूर्वी टाटा मोटर्स (Tata Motors ), ह्युंदाई (Hyundai ), किया (Kia ) आणि टोयोटा (Toyota ) सारख्या कार निर्मात्या कंपन्या त्यांच्या सीएनजी श्रेणीचा विस्तार करण्याचा विचार सुरु केला होता. टाटा मोटर्स कंपनीचे Tata Nexon मॉडेल हे इलेक्ट्रिकमध्ये भरपुर प्रमाणात विक्री झाले. आता Tata Nexon सीएनजीच्या रूपात भारतीय बाजारपेठेत येणार आहे.

Advertisement

अलीकडीचे या सीएनजी मॉडेलची रस्त्यावर चाचणी घेण्यात आली. हे नवीन मॉडेल 1.2-लिटर रेव्होट्रॉन टर्बो पेट्रोल इंजिन, दोन गिअरबॉक्स पर्यायांसह 6-स्पीड मॅन्युअल, AMT असे मुख्य फीचर्स या गाडीमध्ये असणार आहे. 120 bhp आणि 170 Nm आउटपुट करणार्‍या नियमित गॅसोलीनच्या तुलनेत CNG प्रकारात 15 bhp कमी पॉवर मिळण्याची शक्यता आहे.

जास्त मायलेजच्या हिशोबाने ही कार नक्कीच चांगला अनुभव देणार आहे. Tata Nexon सीएनजी किटमधून बूट स्पेसमध्ये काही प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे, तर इतर मोठे बदल कारमध्ये होणार नाही. एका रिपोर्टनुसार टाटा मोटर्स आगामी काळात पंच सीएनजी सादर करू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

ही मिनी एसयूव्ही 1.2-लिटर पेट्रोल इंजिनसह फॅक्टरी फिट सीएनजी किटशी जोडलेली असणार आहे. . गॅसोलीन युनिट 85 bhp पॉवर असणारी ही मिनी एसयूव्ही 113 Nm टॉर्क जनरेट करते. टाटा पंच CNG हे मॅन्युअल आणि एएमटी दोन्ही गिअरबॉक्ससह ऑफर केले जाईल.

Advertisement