SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ‘अशी’ होते फसवणूक; काय काळजी घ्याल..?

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक जण गुंतवणूक म्हणून जमीन खरेदी करतात. मात्र, असे व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घेतली जात नाही नि त्यातून लाखो रुपयांना गंडा घातला जातो..

मागील काही दिवसांत जमिनीच्या किंमती गगणाला भिडल्यात. वाढत्या किमतीमुळे प्लॉट बळकावणे, परस्पर जमिनीची विक्री करणे, फ्लॅटवर अनधिकृत ताबा मिळवणे, असे प्रकार होत आहेत. जमिनीच्या व्यवहारामध्ये नक्की कशा प्रकारे फसवणूक होते, नि ते टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊ या.

Advertisement

अशी होते फसवणूक..

बोगस कागदपत्रे, बनावट व्यक्ती
अनेकदा जमिनीची खरेदी-विक्री करताना बोगस कागदपत्रे सादर केली जातात. त्यासाठी बनावट व्यक्ती उभी केली जाते. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी जमीन खरेदी करताना अपडेटेड ऑनलाईन सरकारी कागदपत्रासोबत कागदपत्राची तुलना करावी. कोणताही व्यवहार करताना आधार, पॅनकार्डचीही खात्री करणं गरजेचं आहे..

Advertisement

एकाच जमिनीची अनेकांना विक्री
एकाच जमिनीची अनेक लाेकांनी विक्री केल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. जमीन खरेदीनंतर त्याचे खरेदीखत रजिस्टर केले जाते. नंतर ‘सात-बारा’ उताऱ्यावर त्याची नोंद केली जाते. मात्र, त्यासाठी किमान 2-3 महिन्यांचा कालावधी लागतो.. या काळात जमिनीचा मूळ मालक दुसरा ग्राहक पाहून रजिस्टर खरेदीखत वापरून पुन्हा तीच जमीन विकतो.

असं प्रकरण कोर्टात गेल्यावर, रजिस्टर खरेदीखताची पहिली तारीख ज्याची, तो त्या जमिनीचा मालक ठरतो. पहिलं खरेदीखत कायदेशीर ठरतं. पुढच्या दोन-तीन लोकांची फसवणूक होते. असे प्रकार टाळण्यासाठी महसूल खात्यानं हे व्यवहार ऑनलाईन सर्व्हरशी इंटरलिंक केले आहेत. त्यामुळे खरेदीखत रजिस्टर झाल्यावर लगेच ऑनलाईन ‘सात-बारा’वर फेरफार प्रलंबित असल्याचे दिसते..

Advertisement

इसार एकाकडून, विक्री दुसऱ्याला
जमीन खरेदी-विक्री करताना इसार म्हणून काही रक्कम आधी दिली जाते.. जमिनीचा व्यवहार करताना पूर्ण पैसे दिले जातात. अशी एक पद्धत आहे. मात्र, अनेकदा एखाद्याने इसार दिल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने जास्त पैशांची ऑफर दिल्यास मूळ मालक त्याला जमीन विकून टाकतो. सुरुवातीला इसार दिलेल्या व्यक्तीची फसवणूक होते. ही फसवणूक टाळण्यासाठी इसार पावती झाल्यानंतर निश्चिंत न राहता, लगेच पूर्ण पैसे देऊन रजिस्टर खरेदीखत करावं..

गहाण जमिनीची विक्री
जमिनीचा मूळ मालक जमीन गहाण ठेवून बँकेकडून कर्ज काढू शकतो. या कर्जाची ‘सात-बारा’ उताऱ्यावर नोंद होण्यापूर्वी जमिनीची विक्री केल्यास ग्राहकाची फसवणूक होते. त्यामुळे काही संशय वाटल्यास व्यवहार करण्यापूर्वी बँकेतही चौकशी करायला हवी.

Advertisement

वारसांची हरकत
जमिनीवर वारसांमध्ये मुलींची नावं जोडली नसतील किंवा काही वारसांची नावे नसल्यास, अशी जमीन खरेदी करु नये. जमिनीच्या कुळांनी वा वारसांनी आपल्या हक्काचा दावा केल्यास, ही केस कोर्टात बरीच वर्षे चालते. त्यामुळे जमीन खरेदीपूर्वी वारसांची नीट माहिती घेतल्यावरच व्यवहार करा.

काय काळजी घ्याल..?

Advertisement
  • जमीन व्यवहारात सवणूक झाल्यास अर्जासह जमिनीचे कागदपत्रे तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन तक्रार करता येते. शिवाय पोलिसांतही तक्रार करता येते.
  • फसवणूक टाळण्यासाठी कागदपत्रांची खात्रीलायक तपासणी करणं, सर्वाधिक महत्वाचे आहे. कोणत्याही व्यवहारात इतरांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः खात्री करून निर्णय घ्यावा.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement