SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

असं ठेवा स्वतःला सोशल मीडियावर सुरक्षित

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्व जगभरातल्या अनेक गोष्टींशी रोजच्या रोज कनेक्टेड राहतो. मात्र, सोशल मीडिया आणि मेसेजिंग अ‍ॅप्समुळे आपलं आयुष्य जसजसं सोपं होत आहे, तशीच आपली प्रायव्हसी मात्र कमी होत आहे. अनेक हॅकर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन मार्गांनी फसवणूक करत असतात. अशा परिस्थितीत सोशल मीडियाचा वापर करताना आपण सर्वतोपरी खबरदारी घेणं खूप गरजेचं असते. सोशल मीडियाचा वापर करताना सुरक्षित राहण्यासाठी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर 5 उपाय सांगण्यात आले आहेत. या उपाययोजनांचा वापर केल्यास तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.

पब्लिक सर्चमधून स्वतःची प्रोफाइल ब्लॉक करा :

फेसबुकसारख्या (Facebook) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला असा अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध आहे. याद्वारे तुम्ही तुमचं प्रोफाइल सुरक्षित ठेऊ शकता. यामुळे कोणतीही व्यक्ती तुमचं प्रोफाइल सर्च करू शकणार नाही. यामुळे तुमच्या प्रोफाइल फोटोवरून काही अनुचित प्रकार घडणार नाही.

सोशल मीडियाचे पासवर्ड इतरांना शेअर करू नका :

आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या पासवर्डसारखा गोपनीय तपशील शेअर करू नये. असं केल्यास काहीवेळास आपलं अकाउंट धोक्यात येण्याची शक्यता असते.

अनोळखी लिंकवर क्लिक करणं टाळा

तुम्हाला सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची विचित्र दावे करणारी लिंक आली तर शक्यतो त्यावर क्लिक करणं टाळा. हॅकर्स अशा लिंक्स पाठवत असतात. त्यावर क्लिक केल्यास तुमचं अकाउंट हॅक होण्याचा किंवा बँकेचे खाते रिकामे होण्याची शक्यता असते.

प्रोफाइलच्या प्रायव्हसी सेटिंगकडे लक्ष द्या

सोशल मीडियावर तुमचं प्रायव्हसी सेटिंग शक्य तितकं रिस्ट्रिक्ट करा. विशेषतः प्रोफाइल अधिक सुरक्षित कसं राहील याकडे अधिक लक्ष घ्या.

फोटो, स्टेटस शेअर करताना सावधानता बाळगा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो, स्टेटस शेअर करताना किंवा कमेंट करताना अधिकधिक सावधगिरी बाळगा. अन्यथा अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाढते.

Advertisement