SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बाईक प्रेमींसाठी वाईट बातमी : भारतातील एकमेव ‘क्रूझर बाईक’चे उत्पादन बंद

मुंबई :

मागच्या काही दिवसांपासून भारतात इलेक्ट्रिक गाड्या जास्तीत जास्त वापरात याव्यात सरकारकडून वेगवेगळी धोरणे आखली जात आहेत. यामुळे काही वाहनांच्या कंपन्यांनां चांगलाच फटका यामुळे बसला आहे. भारतातील Suzuki Motorcycle Indiaने आपल्या एका लोकप्रिय बाईकचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Suzuki Motorcycle Indiaने नुकताच Intruder 150 बाईकचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Suzuki Intruder ही बाईक 2017 साली लाँच करण्यात आली होती. 2020 मध्ये BS-VI इंजिनसह रीलाँच करण्यात आली होती.

सुझुकीच्या इतर बाईक्सप्रमाणे ही बाईक मात्र लोकप्रिय ठरली नाही आणि लोकांनी जास्त पसंद केली नाही. या बाईकचे उत्पादन बंद होण्यापूर्वी या बाईकची एक्स शोरूम किंमत 1.20 लाख रुपये होती. Suzuki Intruder 150 ला बाजारात बजाज अव्हेंजरने जोरदार टक्कर दिल्यामुळे काही प्रमाणात Suzuki Intruderला विक्रीच्या बाबतीत फटका बसला. मिळालेल्या माहितीनुसार आता सुझुकी मोटारसायकल भारतातील आपल्या नवीन मॉडेल्सवर काम करत आहे. गेल्या वर्षी कंपनीने भारतात अत्यंत लोकप्रिय असणारी आणि महागडी असणारी Hayabusa बाईक लाँच केली होती.

Advertisement

यासोबतच कंपनी V-Strom SX 250 बाईकच्या उत्पादनावर भर देत आहे. Hayabusa आणि V-Strom SX 250 बाईक्सची विक्री आणि उपकरणे पुरवण्यावर कंपनी सध्या अधिक भर देत आहे.

सुझुकी मोटरसायकलने चालू वर्षात मे महिन्यात 71,526 बाईक्स आणि स्कूटरची विक्री नोंदवली आहे. कंपनीने विक्रीत 0.6 टक्क्यांची किरकोळ घट नोंदवली आहे. 71,526 बाईक्स पैकी कंपनीने देशांतर्गत बाजारात 60,518 युनिट्सची विक्री केली आहे.

Advertisement