SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारत-दक्षिण आफ्रिकेतील पाचवा सामना संकटात, विजेता कसा ठरणार..?

क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील टी-20 मालिकेतील पाचवा सामना आज (रविवारी) सायंकाळी बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे.

आजचा पाचवा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी भारतीय संघाला आहे.. मात्र, त्याआधीच एक ‘बॅड न्यूज’ समोर आलीय.. बंगळुरूमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Advertisement

सामन्यावर पावसाचे सावट

पावसामुळे रणजी ट्रॉफीच्या सामन्यांवरही परिणाम झाला होता. त्यामुळे आजच्या पाचव्या टी-20 सामन्यावरही पावसाचे सावट आहे. पावसामुळे हा सामना खेळवला गेला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेता घोषीत केले जाऊ शकते, कारण या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. पहिले दोन्ही सामने सलग हरल्यानंतर टीम इंडियाने ‘कम बॅक’ करताना सलग दोन सामने जिंकले. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास शिखरावर असून, टीम इंडियाला मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे, मात्र पाऊस झाल्यास टीम इंडियाच्या आशा धुळीस मिळू शकतात.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज सायंकाळी वादळी पावसाचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे कमी षटकांचाही सामना होऊ शकतो. चिन्नास्वामी स्टेडियमच्या मैदानावर अद्ययावत पद्धतीची ड्रेनेज सिस्टीम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यास लगेच खेळाला सुरवात होऊ शकते.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement